शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पेथाई’ने सातारकर गारठले! : सातारा जिल्ह्यातील चित्र - पारा ९.५ पर्यंत घसरला; सर्वाधिक थंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:31 IST

बंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळ सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळ सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टी परिसरात जनजीवन विस्कळीत

सातारा : बंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळ सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातही पारा कोसळल्याने सातारकर गारठले आहेत.

राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात घट होऊन थंडी आणखी वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत थंडीचा कडाका अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाढत्या गारठ्याचा सामना करण्यासाठी सातारकरांनी हिटर आणि शेकोटीचा पर्याय निवडला आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर सर्वपरिचित आहे. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आणि उत्तम पाहुणचारासाठी अनेकांनी महाबळेश्वरला पसंती दिली आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणावर विवाह होत आहेत. लग्नासाठी आलेल्या वºहाडींना गारठा सुसह्य व्हावा, यासाठी मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी ओपन हिटर, काहींनी शेकोटी तर कोणी कोळशाच्या शेगडीचा उपयोग केला आहे. लग्न किंवा स्वागत समारंभात वधू-वरांना भेटल्यानंतर काही काळ या हिटरखाली बसून अनेकांनी गारठा सुसह्य केला.

सातारा शहरातही वाढत्या गारठ्यामुळे सातारकर रात्री उशिरा बाहेर पडणं टाळत आहेत. दिवसभर गारठा जाणवत असल्यामुळे अंगावर स्वेटर घालूनच फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गारठ्यात स्वेटर घालण्याबरोबरच सातारकर कानटोपी, हातमोजे आणि सॉक्स घालणं पसंत करत आहेत.ढगाळ वातावरणामुळे थंडीचा पारा कमीगत सप्ताहात दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीची लाट कमी झाली होती. ढगाळ वातावरणात थंडीचा पारा कमी झाला. त्यामुळे गारठा कमी होणार, असं वाटत होतं; पण आता पुन्हा पेथाई चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाले आहेत. गारठ्याची लाट पुन्हा आल्यामुळे पारा कमी होऊन गारठा वाढला आहे.गत सप्ताहातील तापमानवार दिनांक कमाल किमानसोमवार दि. १० डिसेंबर ३२.० १५.४मंगळवार दि. ११ डिसेंबर ३०.५ ९.५बुधवार दि. १२ डिसेंबर ३१.२ ११.२गुरुवार दि. १३ डिसेंबर २८.६ ११.१शुक्रवार दि. १४ डिसेंबर २६.१ १७.५शनिवार दि. १५ डिसेंबर २७.३ १८.४रविवार दि. १६ डिसेंबर २७.१ १५.७सोमवार दि. १७ डिसेंबर २६.२ ११.४मंगळवार दि. १८ डिसेंबर २६.१ ११.९