पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात भूगोलशास्र विभागाने आयोजित केलेल्या ‘पदवीनंतरच्या रोजगार संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन’ या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. एस. डी. पवार, जिमखाना उपाध्यक्ष व भूगोलशास्र विभागप्रमुख डॉ. माने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. एन.जी. जाधव, प्रा. एस.पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. एम.आर. सपकाळ म्हणाल्या, भूगोलशास्र विषयातून नोकरीच्या खूप संधी उपलब्ध आहेत. भूगोलशास्रातून जीआयएस, रिमोट सेन्सिंग, भूमिअभिलेख कार्यालय, हवामान, जीपीएस यासारख्या विभागात तसेच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध खात्यात एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध आहेत.
यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. एस.पी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.