शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 12, 2015 00:34 IST

राजेंद्रसिंह राणा : नदी किनारी असणारी अतिक्रमणे हटविणे गरजेचे

वाई : ‘संत वाहते कृष्णामाई’अशी ओळख असणाऱ्या कृष्णा नदीची अवस्था ओंगळ स्वरूपाची झाली असून, तिला प्रदूषणमुक्त करावयाचे असल्यास शासनाबरोबर व्यापक लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी धोममधील नरसिंह ते भद्रेंश्वर मंदिरपर्यंत कृष्णा नदीच्या पाहणीदरम्यान केले़ यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, मुख्याधिकारी आशा राऊत, इनटॅकचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव समूह संस्थेचे मकरंद शेंडे, वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड, रोटरीच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, डॉ. शरद अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कृष्णा नदीच्या पाहणी दरम्यान पुरातन मंदिर व त्या परिसरातील घाट यांची पाहणी करून हा ऐतिहासिक ठेवा पाहून समाधान व्यक्त केले़ परंतु सध्या मंदिराच्या डागडुजीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे होत असलेले दुर्लक्ष पाहून चिंता व्यक्त केली. नदीची पाहणी करून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याबाबत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे वाईपर्यंत संपूर्ण पात्रात प्रत्येक गावात सोडण्यात येत असलेले सांडपाणी व नदीच्या किनारी अतिक्रमणे हटविण्याविषयी शासनाने पुढाकार घ्यावा, असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आदींनी कृष्णा नदी शुद्धीकरणाविषयी आपले मत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)