शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची अश्लील चेष्टा करणाऱ्यांना माफी नाही

By admin | Updated: October 6, 2014 22:35 IST

सदाभाऊ खोत : पुसेसावळी येथे मनोज घोरपडे यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी पक्षाच्या ‘धरणा’वर चर्चा

पुसेसावळी : ‘आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याच्या फक्त वल्गनाच केल्या. जनतेने पाणी मागितले तेव्हा कोरड्या धरणाचं नाव घेऊन अश्लील भाषेत बोलून कार्यकर्त्यांचे मनोरंजन व जनतेची चेष्टा केली. ती जनता आता तुम्हाला माफ करणार नाही,’ अशा भाषेत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी इशारा दिला.पुसेसावळी, ता. खटाव येथील महात्मा गांधी विद्यालायाच्या प्रांगणात भाजपप्रणित व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी श्रीकांत पाटील, जगन्नाथ माने, पंढरीनाथ भाग्यवंत, भीमराव घोरपडे, अरविंद कांबळे, संजय शेडगे, विकास पवार, दीपक काटकर, सुनील पिसाळ, नारायण पिसाळ, दस्तगीर पटेल, अंकुश भोंड, सुबराव अवघडे, विवेक गायकवाड, अंकुश पाटील,सत्यवान कमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष वेगळे नाहीत. त्यांच्या सिंचन घोटाळ्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हा सिंचन घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्र हिरवागार दिसला असता. सिंचनात केलेला घोटाळा लपविण्यासाठी आत्मक्लेष केले, त्यावेळी दिवंगत चव्हाण यांना देखील रडू कोसळले असेल. हा भाग इंग्रजांबरोबर लढणाऱ्या क्रांतिकारकांचा आहे. या भागाला व महाराष्ट्राला लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गाडण्याचे काम करा.’ ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना जनतेच्या पे्रमावर उभी आहे. संघटनेचा कोणताच कार्यकर्ता गद्दार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घोटाळ्यांचा कळस व अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी आहे. भाजप मित्रपक्षांचे शासन आल्यावर भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात जावेच लागणार आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल, तर पाच वर्षे सत्ता द्या. शेतकऱ्यांच्यासाठी किती गुन्हे दाखल झाले तरी शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही. आयुष्यभर बळीराजाची सेवा करणार आहे. भ्रष्ट राजकारण्यांची सत्ता उलथून टाकण्याची वेळ आता आली आहे. कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढविण्याची माझ्यात हिंमत आहे. सत्ताधाऱ्यांनो तुमच्यात आहे का?’ असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्यासाठी रक्त सांडण्याची तयारी असणाऱ्या मनोज घोरपडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. (वार्ताहर)पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी उदासीन : घोरपडेमनोजदादा घोरपडे म्हणाले, ‘पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सांगलीला जाणाऱ्या पाण्याबद्दल सत्ताधारी मौन पाळतात; पण खटावला पाणी मिळाल्याशिवाय आपण सांगलीला पाणी जाऊ देणार नाही. सत्ताधाऱ्यांनी कारखान्याच्या माध्यामातून सभासदांची फरफट चालवली आहे. सिंचनाच्या बाबतीत चौकशी लावली, तर सर्व भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल.’