शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोयीच्या राजकारणाला पवारांचे टॉनिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:27 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या मागील पिढीमध्येही वाद होते. तर आता या ...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या मागील पिढीमध्येही वाद होते. तर आता या दोघांमध्येही वाद होतात व पुन्हा मिटतात. त्यामुळे सातारकरांना आता याची सवय झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे दोघे राजे एकत्र येताना दिसत आहेत. म्हणूनच कार्यकर्ते आणि जनतेने फार अपेक्षा लावून काही फायदा होईल, असे दिसत नाही. सर्वांची अवस्था मुकी बिचारी कोणीही हाका, अशीच झाली आहे.राजेंच्या दोन पिढ्यांमधील वाद सर्व सातारकरांना माहिती आहेत आणि त्यांना एकत्र आणणाऱ्या बुर्जुग व्यक्तींनाही हे फार ताणले जाणार नाही याची जाणीव आहे. पण यामध्ये भांडत बसतात बिच्चारे कार्यकर्ते. त्यांना वाटते खरेच राजेंमधून विस्तव जात नाही. त्यासाठी मग जीवावर उदार होऊन ते ‘राजे तुमच्यासाठी कायपण’ असे गाडीवर आणि छातीवर मिरवत फिरत असतात. याला कुठेतरी आवर घातला पाहिजे.आपल्या अंगावर आले की कोणी कोणाचा नसतो शेवटी कांगारू नाकापर्यंत पाणी येईपर्यंत पिलाला वाचवते आणि नाकातोंडात पाणी जायला लागले की पिलाला पायाखाली घेते. ही लहानपणी शिकलेली गोष्ट आपण विसरत चाललो आहोत काय? त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांना तोंडावर पडण्याची वेळ येते. दोन्ही राजे वेगळे झाल्याचे आणि पुन्हा एकत्र आल्याचे सातारकर उत्सुकतेने पाहतात आणि पुन्हा त्याच मानसिकतेत एकमेकांच्या भलावाणी करतात. केवळउत्सुकता याशिवाय यात काहीच राहत नाही.सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आणि खासदार उदयनराजेंना राष्ट्रावादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी जिल्हाभर दौरे करून स्वत:ची ताकद उभी केली आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्वास स्वत:मध्ये निर्माण केला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी दोन्ही राजेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. (तसे दोघांनाही फार काळ लांब राहायचे नव्हतेच) पण त्यासाठी कोणी तरी वैद्य पाहिजे होता. ती जबाबदारी खासदार शरद पवार यांनी पारपाडली.गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांनी अनेकांना आपल्या गाडीतून प्रवास घडविला आहे. त्यांनी एखाद्याला आपल्या गाडीत घेतले की सर्वांनी काही गोष्टी समजून घ्यायच्या, असा प्रघात झालेला आहे. कोणालाही पवारांच्या गाडीत सहज प्रवेश मिळत नाही, तर ते नियोजनपूर्वक ठरविले जाते. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पवारांसोबतचा गाडीतील प्रवास बरेच काही सांगून जातो. त्याचाप्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावत असतो.राज्यातील काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्या. मात्र, साताºयाच्या आणि माढ्याच्या जागेबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. कोल्हापूरमधील राष्ट्रवादीची जागाही अडचणीची होती. मात्र त्याबाबत शरद पवार यांनी या जागेवर विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, असे जाहीर केले आहे. तसे सातारा आणि माढाबाबत झालेले नाही. त्यामुळे या जागांवर नक्की कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. या जागांवर काहीजण राष्ट्रवादीकडून दावा करू लागल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण झालाआहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोणालाच अजूनही अंत लागू दिला नाही. ते फारसे कोणाला अंगाला लागूनही घेत नाहीत. त्यामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र्र मोदी देखील त्यांच्यापासून सावध राहा! असाच सल्ला राज्यात आल्यानंतर देतात आणि केंद्रात सोबत राहून अनेक चर्चा घडवून आणतात.राजकारणात सब कुछ माफ असते, असे म्हटले जाते. अनेकदा खासदार उदयनराजेही राजकारण म्हणजे काय याची व्याख्या सांगतात. जे दिसते तसे कधीच करायचे नाही आणि जे करायचे ते कधीच दाखवायचे नाही. यालाच राजकारण म्हणतात. त्यामुळे शरद पवार काय दाखवितात आणि करतात याचा अर्थ समजून घेतला तरी बºयाच गोष्टी साध्य होतील.परिस्थितीच्या राजकारणाला प्रारंभ...राजे आणि जनता यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. कार्यकर्त्यांना न दुखवता एकमेकांच्या कार्यकर्त्यांसाठी दोन्ही राजे भांडतात असे दिसते; पण आता कार्यकर्त्यांचा काहीच विषय नाही. आता आमदारकी आणि खासदारकी असा सामना होणार आहे. त्यामुळे राजेंचा विषय आल्यावर कार्यकर्ते काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे असणार आहे. दोन्ही राजेंना आपापला मार्ग मोकळा करावयाचा आहे. खासदारकीचा मार्ग सुकर झाला तर उदयनराजे आमदारकीसाठी शिवेंद्र्रराजेंना मदत करतील, अशी आशा आहे. पण करतीलच हा विश्वास नाही. तर शरद पवारांसाठी खासदारकीला उदयनराजेंना मदत करावी लागेल, अशी शिवेंद्रराजेंची अगतिकता आहे. त्यामुळे दोघांनीही सध्याच्या परिस्थितीत आपापल्या राजकारणासाठी जुळवून घेण्याचे नियोजन केल्याचे दिसते. यालाच परिस्थितीचे राजकारण म्हणतात.