कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेलीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रल्हाद पाटील, उपाध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नेताजी चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव लाटे, तलाठी दादासाहेब कणसे, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, अंजना चव्हाण, सुनील सरगडे, डी. एस. काशिद, वंदना लोहार, दादासाहेब चव्हाण, उत्तम चव्हाण, महेश चव्हाण, शैलेश चव्हाण, शरद चव्हाण, शिवाजी चव्हाण, विवेक चव्हाण उपस्थित होते.
प्रल्हाद पाटील हे माजी पोलीस पाटील असून ते नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात. पोलीस पाटील म्हणून त्यांची कामगिरी चांगली होती. समंजस व्यक्ती म्हणून तंटामुक्त अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तर संदीप चव्हाण हे युवक असून त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्यांची तंटामुक्तच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सरपंच नेताजी चव्हाण यांनी आभार मानले.