शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

पतंगराव कदम : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य असल्याची टीका

By admin | Updated: September 6, 2014 00:10 IST

जिल्ह्यात गतवेळचाच फॉर्म्युला

सांगली : राज्यातील महायुती कर्तृत्वशून्य आहे. त्यामुळेच काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिवास्वप्न ठरेल. लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल, अशा भ्रमात महायुतीने राहू नये, अशा शब्दांत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी आज, शुक्रवारी येथे पत्रकार बैठकीत भाजपच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, काँग्रेस हा विशाल पक्ष आहे. खेड्यापाड्यापासून वाड्यावस्तीपर्यंत पक्षाचा विस्तार झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता; म्हणून काँग्रेस संपली नाही. उलट पक्षाने गरूडभरारी घेतली होती. काँग्रेसने जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. लोकसभेवेळी भाजपची हवा होती. त्यामुळेच केंद्रात बदल झाला. आता विधानसभेवेळीही तेच घडेल, या भ्रमात कोणी राहू नये. महायुतीला सर्वच मतदारसंघात मातब्बर उमेदवार मिळालेले नाही. त्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादीतील उसनवार उमेदवार घेतले जात आहेत. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी ९९ टक्के निश्चित आहे. केवळ आघाडीची घोषणा होणे बाकी आहे. दोन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवारांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविली आहे. आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)जमिनी परत मिळणारराज्यात पाटबंधारे विभागाने पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले आहे. मात्र या जमिनीचा वापर पुनर्वसनासाठी झालेला नाही. या जमिनीवर ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असा शेरा मारला गेल्याने या जमिनी शेतकऱ्यांना विकता येत नव्हत्या. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने अशा जमिनीवरील शेरा कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या क्रांतीकारी निर्णयामुळे वापर न झालेली जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.  

जिल्ह्यात गतवेळचाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील जागा वाटपाचा गतवेळचा फॉर्म्युला कायम राहणार आहे. काँग्रेसने जतच्या जागेची मागणी केली आहे. अपक्षांनी ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य स्वीकारले आहे, त्या पक्षाला संबंधित जागा मिळणार आहे. पलूस-कडेगावमध्ये निवडणूक आल्यावरच विरोधकांकडून नौटंकी सुरू होते. त्यात नवीन काहीच नाही. मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, हेही जनतेला चांगलेच माहीत असल्याचा टोलाही त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता लगावला.