पाटण (जि. सातारा) : भारतीय सेनेच्या १२० इंजिनिअर रेजिमेंटमध्ये आपले कर्तव्य बजावताना पिंपळोशी (ता. पाटण) येथील जवान बाळकृष्ण विलासराव निकम (४१) बुधवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहीद झाले. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणि तेथून लष्करी रुग्णवाहिकेने पिंपळोशी येथे शुक्रवारी आणले जाणार असून, पिंपळोशी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.जवान निकम हे २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. २३ वर्षे त्यांची सैन्यदलात सेवा झाली होती. पुढील वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी सियाचीन, लडाख या ठिकाणी देशसेवा केली. अंतिमसमयी ते सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर होते. दोन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर तेथे रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
Web Summary : Balkrishna Nikam, a soldier from Pimploshi, Patan, martyred in Sikkim while serving in the Indian Army. He served for 23 years, including in Siachen and Ladakh. He is survived by his family; final rites in Pimploshi.
Web Summary : पाटन के पिंपलशी के जवान बालकृष्ण निकम सिक्किम में शहीद हो गए। उन्होंने सियाचिन और लद्दाख में भी सेवा की। 23 साल तक सेना में रहे। उनके परिवार में माता-पिता, पत्नी और बच्चे हैं। पिंपलशी में अंतिम संस्कार किया जाएगा।