शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

पाटणला अर्ध्या तालुक्यावर बिबट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:44 IST

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर्ध्या तालुक्यातील जनता बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.पाटण तालुक्यातील विविध भागांत ...

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर्ध्या तालुक्यातील जनता बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.पाटण तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजपर्यंत त्याने मानवावर हल्ला केला नाही. मात्र, मानवी वस्तीत येऊन तो मोकाट, पाळीव श्वान, शेळ्या, लहान रेडके यांच्यावर हल्ला करत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, मानवी वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र दिसत आहे. आजपर्यंत विविध कारणास्तव तालुक्यात झालेली बेसुमार वृक्षतोड, लोकसंख्या वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जंगलक्षेत्रात केलेले सपाटीकरण, नष्ट होत असलेली वनसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली आहेत. याशिवाय जंगल परिसरात लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार खुलेआम केली जात असल्याने वनप्राण्याच्या खाद्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे खाद्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतात काम करण्यास जाणारे शेतकरी, शेतमजूर, सकाळी व्यायाम करण्यास जाणारे ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने चाफळ भागात लावलेला पिंजºयाने पूर्ण पावसाळा सोसला. ठोस कार्यवाही न झाल्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अर्धा तालुका बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे दिसते. दोन-तीन वर्षांपासून बिबट्या मानवी वस्तीजवळ लहान-मोठ्या पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत....या गावांत बिबट्याचा मुक्कामउरूल, विहे, मोरगिरी, चाफळ, मारूल हवेली, दिवशी बुद्रुक विभागात असे प्रकार सतत घडत आहेत. उरूल भागातील ठोमसे, उरूल घाट, विहे घाट येथे तर बिबट्या मुक्कामालाच आहे. उरूल घाटात पाटण-उंब्रज मार्गावर डोंगराच्या आसपास त्याचे दर्शन प्रवाशांसह ग्रामस्थांच्यासाठी नित्याचीच बाब झाली आहे. उरूल, मल्हारपेठ, विहे, मोरगिरी, मारूल हवेली भागातील वाडीवस्तीवरील लोक वस्तीत घुसून बिबट्याने घराजवळ असणाºया जनावरांच्या शेडवर हल्ला करून अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे.वन संरक्षण समित्या कागदावरतालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती लुप्त होऊ लागली असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. केवळ कागदावरच असणाºया वन संरक्षक समित्या, जंगल परिसरात मानवाचा वाढता हस्तक्षेप, छुपी वृक्षतोड, वन्यप्राण्यांची होणारी चोरटी शिकार, लोकसंख्या वाढीमुळे वनसंपदेवर आलेले संकट आदी कारणांमुळे तालुक्यातील वनवैभव व वन्य प्राण्यांची दहशत चर्चेत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.