शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

स्वकीयांच्या हल्ल्यात पक्ष अन् उमेदवार घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:19 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे. तर कोणी वेगळी चूल मांडत आहे या प्रकारामुळे युती आणि आघाडीसाठी ही नवीच डोकेदुखी ठरली आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घेण्यासाठी पावले उचलली; पण ‘हाती’ काय लागले नाही. त्यातच राष्ट्रवादीला विरोध करणाऱ्या महाआघाडीतील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यामुळे महाआघाडीतील काहीजण नाराज झाले. परिणामी रणजितसिंहांनी ‘हात’ सोडून कमळ जवळ करत उमेदवारीही मिळवली; पण काँग्रेस घायाळ झालीच. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यावेळी जिल्ह्यात एक नंबरवर पक्ष घेऊन जाण्याच्या वल्गना सर्वांनीच मतभेद विसरून केल्या; पण रणजितसिंहांच्या भाजपमधील जाण्याने काँग्रेस बॅकफूटवरच गेली.राष्ट्रवादीत असणारे शेखर गोरे यांचा पक्षावर राग आहे. पाच दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांनी ताकद दाखवून दिलीय. तर साताऱ्यात रविवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले व पक्षही सोडला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धक्काच आहे. तसेच पक्षातून बाहेर पडण्याने माण तालुक्यात पक्ष आणखी कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादीला हे भगदाड मुजवता मुजवता नाकीनऊ येणार आहे. तर शेखर गोरे यांनी या निवडणुकीत माढ्यातील भाजप उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.जावळीतील भाजप नेते अमित कदम पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच; पण राजकीय घडामोडीत ते भाजपवासी झाले. ते सातारा लोकसभा मतदार संघात वेगळी चूल मांडत आहेत. शिवसेनेचा उमेदवार व युतीची नेतेमंडळी विचारात घेत नाहीत. पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते, हे त्यांचे व कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण. त्यामुळे मेळावा घेऊन निवडणुकीत वेगळा विचार करू, अशा निर्णयापर्यंत कार्यकर्ते आले आहेत. युतीच्या उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा ठरलीय. तसे पाहायला गेले तर उदयनराजे भोसले यांच्याबरोबर कदम यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे ते अंतिम निर्णय काय घेतात यावर बरेच अवलंबून आहे.भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम हे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र आहेत. आजही त्यांचा तालुक्यात गट आहे. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देताना पक्षाने विचारले नसल्याची सल त्यांना होती.त्यामुळे मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांना भेटून सल्लामसलत केली. मात्र, दुसºयाच दिवशी त्यांनी माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलकेला. त्यांचा गट किती मोठा यापेक्षा चुरस असताना एक-एक मतही महत्त्वाचे आहे. इथे कदम यांनीमाघार नाही घेतली तर त्याचापरिणाम कदाचित कोणासाठीचांगला तर कोणासाठी वाईटही ठरू शकतो.डोकेदुखीवर जालीम औषधाची गरज...लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय गणिते सतत बदलत आहेत. कधी उमेदवारीवरून तर कधी विचारात घेतले नसल्याचा कारणावरून. संबंधित राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची ही खदखद निवडणुकीत आपल्याच उमेदवाराला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे यावर पक्षातीलच वरिष्ठांना औषध शोधावे लागणार आहे.