शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

सातारा : उंब्रजमध्ये मुलांच्या शाळा इमारतीसाठी पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:27 IST

उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या शाळा इमारतीसाठी बुधवारी सकाळीच पालकांनी आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देउंब्रजमध्ये मुलांच्या शाळा इमारतीसाठी पालकांचे आंदोलनठोस निर्णय होत नसल्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त

उंब्रज : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या शाळा इमारतीसाठी बुधवारी सकाळीच पालकांनी आंदोलन सुरू केले आहे.येथील मुलांच्या शाळेला इमारत मंजूर करावी म्हणून बुधवारी पालकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले आंदोलन दोन तास सुरू होते.

प्रशासनाच्या वतीने ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत. तसेच ठोस निर्णय होत नसल्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त होऊ लागले होते.शाळेच्या मुख्यदरवाज्यासमोर सुरू असलेले आंदोलन शाळेला लागून असलेल्या महामार्गाकडे सरकू लागले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हळूहळू आपला मोर्चा उपमार्गावर वळवून आंदोलन सुरू केले. यावेळी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला.

पोलिसांनी बळाचा वापर करून प्रमुख आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. परंतु त्यानंतरही हे आंदोलन सर्व पालकांनी हातात घेतले व सर्वजण शाळेच्या पटांगणावर ठिय्या मांडून होते. पालकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन कोणता निर्णय घेतेय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतzp schoolजिल्हा परिषद शाळा