शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘मोक्का-तडीपार’चा नवा ‘देशमुखी पॅटर्न’ राजकीय दबाव झुगारणार : पंकज देशमुख यांनी स्वीकारला पद्भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:35 IST

मोक्का, तडीपारीच्या कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत यापुढेही अशीच कडक भूमिका घेतली जाईल. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे,

सातारा : मोक्का, तडीपारीच्या कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत यापुढेही अशीच कडक भूमिका घेतली जाईल. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ती प्रकरणेही शेवटाला नेण्याचाच प्रयत्न राहणार आहे. गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’ असा स्पष्ट इशारा नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला.

संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकज देशमुख यांनी बुधवारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.

यावेळी पंकज देशमुख म्हणाले, ‘काम करत असताना राजकीय स्वरुपाचा दबाव टाकला जात असतो. मात्र, जनतेच्या दृष्टीने शांतता आणि कायदा अबाधित राहिला पाहिजे, यासाठी कोणत्याही स्वरुपाचा दबाव सहन करणार नाहीर. अशा दबावाला बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहणार आहे. सातारा जिल्हा तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.’

पोलीस कर्मचाºयांच्या वसाहतीचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत सातारा वेल्फेअर फंडाकडून माहिती घेतली नाही. मात्र, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या आर्किटेक्चरकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच टेंडर प्रक्रिया झाली. त्यामुळे माझ्या स्तरावर असलेला पाठपुरावा करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे.दरम्यान, अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सातारा जिल्ह्यातील तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली.सातारकरांचे मन मोठे....संदीप पाटील यांनी केलेल्या कामामुळे सातारकरांनी त्यांची बदली रद्द व्हावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. एखाद्या अधिकाºयाने केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी अशा प्रकारे देणे हे कौतुकास्पद आहे. सातारकरांचे मन खूप मोठे आहे, त्यामुळे काम करताना सकारात्मक कामाचे दडपण आहे.सामान्यांशी संवाद ठेवणार...पोलीस प्रशासन आणि जनतेमध्ये संवाद असला पाहिजे. दोघांमध्ये सुसंवाद असेल तर अनेक प्रश्न सुटत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटन आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसासोबत संवाद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे