शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

परिवर्तन नव्हे तर गैरवर्तन करणाऱ्या उमेदवारांचे पॅनेल : विजय बडेकर

By admin | Updated: May 31, 2016 00:38 IST

खोटे बोलणाऱ्यांचा खरा चेहरा सभासदांपुढे उघड : प्रकाश बडेकर --सांगा, जनता बँक कोणाची..?

सातारा : ‘सहकार आणि बँकिंग क्षेत्राचा एवढाच तुमचा अभ्यास असेल तर अगोदर तुमचा प्रकाश ज्ञानसोना पतसंस्थेत पाडावा. जिल्हा बँकेच्या बैठकीतून काजू खिशात भरून आणणे आणि नातेवाइकांसाठी खिमा पार्सल आणणे एवढे सोपे काम जनता बँक चालवणे हे नाही. तुमच्या काळातच जनता बँक तोट्यात गेली त्यावेळी तुमची अक्कल व हुशारी कुठे गहाण ठेवली होती. तुमच्यासारख्या स्वार्थी प्रवृत्तीचे जनता बँकेतून सभासद समूळ उच्चाटन करतील,’ असा विश्वास भागधारक पॅनेलचे प्रमुख उमेदवार आणि नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी व्यक्त केला. शाहूनगर, गोडोली भागात भागधारक पॅनेलची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, माधव सारडा, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, आनंदराव कणसे, चंद्रशेखर घोडके, अरुणकुमार यादव, अतुल जाधव, निशांत पाटील, वसंत लेवे, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, रवींद्र माने, वजीर नदाफ, नारायण ऊर्फ बाळासाहेब लोहार, डॉ. चेतना माजगावकर, सुजाता राजेमहाडिक, अशोक मोने, बाळासाहेब गोसावी व शेकडो सभासद उपस्थित होते. विजय बडेकर म्हणाले, ‘सारडा कुटुंबीयांच्या आशीर्वादामुळे प्रकाश बडेकर जनता बँकेत आले. मात्र कधीही कोणाशीही प्रामाणिक राहायची सवय त्यांना नाही. प्रत्येक संस्थेत जाऊन स्वत:चा स्वार्थ साधायचा आणि बँकांना उदरनिर्वाहाचे साधन बनावायचे अशी त्यांची प्रवृत्ती आहे. परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रकाश गवळी यांनीच यापूर्वी प्रकाश बडेकर यांच्यावर कोअर बँकिंग प्रणालीच्या कामकाजावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते; पण आता ‘आपण सगळे भाऊ-भाऊ जनता बँक वाटून खाऊ,’ अशा उद्देशाने सगळे एकत्र आले आहेत.’रामभाऊ साठे म्हणाले, ‘रफिक बागवान यांनी समोरासमोर येऊन साधी एन. पी. ए. ची व्याख्या सांगितली तरी जनता बँकेचे भागधारक पॅनेल त्यांची पाठ थोपटेल. उगाच दुकानात बसून खोट्या थापा मारायच्या आणि खोटे बोलायचे एवढाच त्यांचा उद्योग चालू असतो. खोटे बोलण्यात त्यांच्याइतका पटाईत माणूस साताऱ्यात सापडणार नाही.’बँकेच्या सर्व सभासदांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतली असून, सभासद भागधारक पॅनेलच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास यावेळी भागधारक पॅनेलचे प्रमुख अ‍ॅड. मुकुंद सारडा, बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाजू, माजी अध्यक्ष भास्कराव शालगर व विद्यमान अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)खोटे बोलणाऱ्यांचा खरा चेहरासभासदांपुढे उघड : प्रकाश बडेकरसातारा : ‘विधीनिषेधशून्य प्रचारकी थाटामुळे व रेटून खोटे बोलणाऱ्यांचा खरा चेहरा सभासदांपुढे आलेला असून, पायाखालची वाळू सरकली आहे. आता वैयक्तिक चिखलफेक सुरू झाल्याने बँकेमध्ये होणारे परिवर्तन आता टळणार नाही हे वृत्तपत्रांद्वारे निंदानालस्ती करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे आणि त्यातही स्वत:ला अगदी रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर असल्याची भाषा करणाऱ्या संचालकांची विनोद बुद्धी ही बँक चालविण्यास उपयोगाची नाही,’ असे मत जनता सहकारीबँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश बडेकर यांनी व्यक्त केले आहे. परिवर्तन पँनेलने शाहूपुरी परिसरात भेटी देत परिवर्तन पॅनेलची भूमिका सभासदांना समजावून सांगितली. यावेळी परिवर्तन पँनेलचे प्रशांत आहेरराव, प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले, किशोर गोडबोले, राजन जोशी, वसंत जोशी, प्रा. डॉ. धनंजय देवी, सुभाष निकम, नरेंद्र पाटील, अ‍ॅॅड. बाळासाहेब बाबर, रफीक बागवान, नीलेश महाडिक आदी उपस्थित होते.शाहूपुरीतील पदयात्रेत बँकेच्या कारभाराविषयी राजन जोशी म्हणाले, ‘बँकेचे हे संचालक निवडून न येता मागच्या दाराने कायदे, नियम पायदळी तुडवून व शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हवे तसे नाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकार अंगलट येत असल्याने व लाभांशाचे सामूहिक क्रेडीट फक्त आपल्या नावावर खपविण्याचा उद्योग उघडा पडल्याने वडीलधार्ऱ्यांची बदनामी करण्याचा त्यांचा कट सभासद आता यशस्वी होऊ देणार नाहीत. कोणतीही आर्थिक संस्था विशेषत: बँक, पतसंस्था एका वर्षात फायद्या तोट्यात जात नाही हे उघड गुपित आहे.’ यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, भागधारक पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब जाजू, भास्करराव शालगर, नीलेश महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचे जुने सहकारी , मित्र व जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गुलाबभाई बागवान यांच्या विषयी भागधारक पँनेलने जाहीर केलेल्या भूमिकेविषयी आपले मत जाहीर करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. परिवर्तन पँनेलच्या प्रचारामध्ये जेव्हा पॅनेलने बाळासाहेब जाजू व भास्करराव शालगर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अशी निंदानालस्तीला स्पष्ट विरोध नोंदविला होता. शाहूपुरीतील पदयात्रेत सुनीता बंबाडे, रवींद्र कळसकर, लक्ष्मण कदम,जगदीश खंडागळे, प्रशांत चोरगे, विनायक भोसले,नंदकुमार काटे, ललीत सातघरे, किशोर कांबळे, दीपक सपकाळ, नरेंद्र जांभळे, शाहीन शेख, अभिजित देवरे, अभिनंदन मोरे,अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)