शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या वाटेने निघाली ‘व्यसनमुक्तीची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:51 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यामध्ये ४२७ पेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या आहे. त्यामधील ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देणारे वारकरी सर्वांचे लक्ष वेधत आहेत.‘माउली-माउली...’ अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिवे घाटातून साडेचार किलो मीटरचे नागमोडी अंतर पार करून सासवड येथे दाखल झाला. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हरिनामाचा जप करीत वारीत सहभागी झाले आहेत.टाळ-मृदुंगचा तालावर व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देत ‘वारी व्यसनमुक्तीची’या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली.कीर्तनकार बंडातात्या कºहाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, गोशाळा आदी विविध विषयांवर काम सुरू आहे. व्यसनमुक्ती चळवळींमध्ये काम करत असताना गावपातळीवर व तालुका पातळीवर युवकांचे तसेच ग्रामस्थांचे संपूर्ण महाराष्ट्रभरात सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरे अथवा मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पंधराशे तर दोन हजार युवकांना एकत्रित करून दरवर्षी राज्य पातळीवर चार दिवसांची १४ शिबिरे घेतली असून, या माध्यमातून हजारो युवकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली आहे.त्याचबरोबर गुटखा विक्री व अवैध दारूविक्रीच्या विरोधात युवकांनी व महिलांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून शासनाला दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे विविध पातळीवर काम करीत असताना पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत लाखो लोक सहभागी होतात. त्यामध्ये विविध स्तरातून आलेल्या लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वारी व्यसनमुक्तीची या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यात लोकांना दारू, गुटका व तंबाखू व्यसनापासून सुटका होण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.दारूबंदीसाठी सह्यांची मोहीम...राज्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यांमध्येही दारूबंदीचा निर्णय व्हावा, यासाठी मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती युवक संघाच्या माध्यमातून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. ते लाखो लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.