शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाचगणी पालिकेचा सोलर ट्री कोसळला!, निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:28 IST

सहा महिन्यांत जमीनदोस्त

पाचगणी : पाचगणी नगरपालिकेने सिडने पॉइंटवर सहा महिन्यांपूर्वी उभारलेला अत्याधुनिक ‘सोलर ट्री’ सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाला. हा सोलर ट्री पर्यटक नसताना कोसळल्यामुळे कसलीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, यासाठी खर्च झालेले लाखो रुपये ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे पाण्यात गेल्याने पाचगणीकर नागरिक संतप्त झाले आहेत. या घटनेने पाचगणी नगरपालिकेच्या निकृष्ट विकासकामांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.याबाबत माहिती अशी की, पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व पर्यटन पॉइंट सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पॉइंटवर पर्यटकांच्या आकर्षणासाठी खेळणी बसवणे, पॅगोडा, झुलते पूल, गॅलरी अशा विविध कामांसाठी खर्च केला जातो. परंतु, या कामांना निकृष्टतेचा वास नेहमीच येत असतो. सोमवारच्या घटनेतील सोलर पॅनल ट्री याच कामाचा नमुना आहे. सहा महिन्यांपूर्वी सिडने पॉइंटवर एक व टेबल लँडवर एक असे दोन सोलर ट्री बसविले. हे काम ज्या ठेकेदाराने केले आहे ते पूर्णपणे निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास येत आहे.हे ट्री नेहमी जोरदार वारे असणाऱ्या पॉइंटवर बसवले आहेत, त्यामुळे त्यांचे फाउंडेशन दर्जेदार होणे गरजेचे होते. ते खोलवर व चांगल्या प्रतीचे केले नसल्याने हा ट्री पहिल्याच पावसाळ्यापूर्वी कोसळला. या ठिकाणी सर्व सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी सर्वत्र काचांचा ढीग पडला आहे. यात वापरलेले साहित्य चांगल्या प्रतीचे नसल्यानेच हा ट्री कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाचगणी नगरपालिकेने सिडनी पॉइंट येथे लाखो रुपये खर्च करून डिझाईनमध्ये, सोलर युनिट बसविले होते. त्या युनिटमध्ये थोडे आर्थिक वजन कमी पडल्यामुळे ते वाऱ्याच्या झोक्याने जमिनीवर कोसळले. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्ची टाकायचे पण ठेकेदाराने आपल्या जास्तीतजास्त आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करायची. या ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.

पाचगणीत वारा सोसाट्याचा असतो. हे माहीत असताना सहा महिन्यांत हा ट्री कोसळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशी कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. - दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते 

सिडने पॉइंट हा उंचावर असून, या ठिकाणी जोरदार वारे वाहत असतात. सध्या पाऊस सुरू असून, या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे हे युनिट कोसळले आहे. तरीसुद्धा आम्ही संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार आहोत. - निखिल जाधव, मुख्याधिकारी, पाचगणी