शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

समितीच्या इमारतीत नव्या योजनांची ‘पंचायत’

By admin | Updated: November 4, 2015 23:59 IST

कऱ्हाड पंचायत समिती : भित्तिपत्रकांच्या चिंध्या; नवे कोरे बोर्ड पडलेत धूळखात, नोटीसबोर्डवरील प्रसिद्धीपत्रकांची अवस्था गंभीर

कऱ्हाड : १९८ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये मात्र, योजनांच्या प्रसिद्धीबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. एखादी योजना कधी येते आणि कधी जाते याची माहिती मिळत नसल्याने मासिक सभेवेळी अधिकाऱ्यांवर आगपाखड करणाऱ्या पंचायत समितीमधील सदस्यांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीमध्ये सध्या लावण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ‘हात धुण्याचे टप्पे’, ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम’, याविषयी माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी भित्तिपत्रके फाडून टाकण्यात आली असल्याने, योजनांची माहिती देखील या ठिकाणी आल्यास मिळू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नव्या योजनांची अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात नसल्याने नागरिकांसह सदस्यांचीही पंचाईत होत आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच काही दिवसांपूर्वी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायती स्तरावर स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सर्वांना केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रमाणे कऱ्हाड पंचायत समितीमध्येही एक दिवस महास्वच्छता अभियान राबविण्यात आले पण त्यानंतर या अभियानाचे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किती प्रमाणात गांभीर्य घेतले आहे. हे या ठिकाणी फाटलेल्या योजनांच्या भित्तिपत्रकांवरून तसेच येथील अस्वच्छतेकडे पाहिल्यावर दिसते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी व सभापती, उपसभापती यांनी ६ आॅक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान राबविले. मात्र, आता हे किती तालुक्यातील पंचायत समितीमध्ये अभियान सातत्याने राबविले जात आहे. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. कऱ्हाड पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या शासकीय कार्यालयाच्या स्वच्छतेमध्ये सातत्य राखले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता शासकीय योजनांच्या भिंतीवरील फलकांच्या दुरवस्थेमुळे सदस्यांतून अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी) गठ्ठे ही अजून पडूनच..!पंचायत समितीमधील शिक्षण विभागापाठीमागील बाजूस असलेल्या आडोशाच्या खोलीसमोर शासकीय योजनांचे तसेच माहितीच्या फायलींचे गठ्ठे गेल्या दोन महिन्यांपासून पडून आहेत. या गठ्ठ्यांमधून एखादी महत्त्वाची फाईल गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोणास धरले जाईल याचा विचार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे का ? पार्किंगच्या गाड्यांच्या गराड्यात योजना फलक शासकीय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी या हेतूने शासकीय योजनांचे भित्तिपत्रके तसेच बॅनर तयार करण्यात आले. त्यांना शासकीय कार्यालयाबाहेर लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या. मात्र, त्या सूचनांचे कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कऱ्हाड पंचायत समिती इमारतीसमोर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी योजनांचे फलक धूळखात पडलेले आहेत.