शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पंचांची करामत.. पण वस्तीची पंचायत !

By admin | Updated: March 5, 2016 00:08 IST

समाजातील महिलांचेही बंड : पाचवडमधील जातपंचायतीच्या घटनेनंतर समाजाचा हल्लाबोल; जातपंचायत बरखास्त करण्यावर काहीजण ठाम--आॅन दि स्पॉट...

सातारा/पाचवड : ‘साहेब, आमच्या समाजात बघा आजवर असंच होत आलंय... कुणीबी चूक केली तर त्याला पंचायत शिक्षा देती... ती भोगली की त्याला माफ करून समाजात मानाने वागवलं जातं... हे आजवर असंच चालत आलंय; पण आता खरंच बस्स झालंय. हे कुठं तरी थांबलंच पाहिजे बघा...’ हे शब्द आहेत पाचवड येथील गोपाळवस्तीमधील महिलांच्या तोंडचे. जातपंचायतीत बाप-लेकीला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांचा ताफा ‘अंनिस’चे कार्यकर्ते तेथे गेले होते. त्यांच्यासमोर या भगिनींनी आतल्या आवाजाला वाट मोकळी केली.वाई तालुक्यातील पाचवड येथे कुडाळ रस्त्यावर एक इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. या शाळेत भावी पिढी घडवली जात असताच, काही अंतरावरील गोपाळवस्तीत अघोरी प्रकार सुरू होता. पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून दोघांना बांधून मारहाण केली गेली. त्यांना सात हजारांचा दंडही करण्यात आला. हा प्रकार समजल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पोलीस अधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकारात सामील असल्यांनी तत्काळ काढता पाय घेतला; मात्र असंख्य तरुण, महिलांनी या मंडळींना सहकार्य केले. यावेळी जमलेल्या युवकांनी समाजात यापुढे हा प्रकार चालू देणार नाही, अशी ग्वाही दिली. तर समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंनिस व पोलिसांनी संयुक्तरीत्या कृतिआराखडा तयार केला आहे. यामध्ये समाजात चमत्कारविरोधी प्रयोग, जनजागृती केली जाणार आहे. आरोपींविरुध्द चार कलमांचा समावेश..जातपंचायतीचे आयोजन करणाऱ्या सर्जेराव पवार (रा. पाचवड), शिवाजी पवार (रा. सुरूर), सर्जेराव चव्हाण (रा. भुर्इंज), राजाराम चव्हाण (रा. कडेगाव), जीवन पवार (रा. नागेवाडी, ता. सातारा), दत्तू चव्हाण (रा. जोशी विहीर) आणि अरुण दिलीप जाधव (रा. पेरले, ता. कऱ्हाड) या पंचांवर १२० ब नुसार सामाईक कट रचणे, ३८६ (भीती घालून पैसे उकळणे), ३२३ (दुखापत करणे) व ३२४ (गंभीर दुखापत करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे जातपंचायत...गोपाळ समाजामध्ये एखाद्या व्यक्तीकडून जर गैरकृत्य घडले तर त्याला या समाजामध्ये स्थान दिले जात नाही. त्याच्या हातून कोणतेही सामाजिक अथवा कौटुंबिक कार्य केले जात नाही. अशावेळी कायद्याने बंदी घातलेली; परंतु त्यांच्या परंपरेनुसार जातपंचायत बोलावून पंच मान्य करतील, अशी शिक्षा त्याला दिली जाते. समाजामध्ये सामील करून घेतले जाते. या जातपंचायतीमध्ये पंच जे ठरवतात, ती शिक्षा त्या व्यक्तीला भोगावीच लागते, तरच तो त्यांच्या समाजात पुन्हा कार्यरत होऊ शकतो. न्याय व्यवस्थेलाच आव्हान : हमीद दाभोलकरसातारा : ‘पाचवड येथील गोपाळ समाजाने गुरुवारी जातपंचायत भरून त्यामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्या मुलीला व तिच्या वडिलांना जातपंचायतीने फटके मारण्याची शिक्षा दिली. जातपंचायतीने अशाप्रकारे शिक्षा देणे म्हणजे थेट न्याय व्यवस्थेलाच दिलेले आव्हान आहे,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केवळ दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१५ पारित केला आहे. साताऱ्यासारख्या प्रगतशील जिल्ह्यात अशी घटना घडणे, हे निंदनीय आहे. या जातपंचायतीमध्ये ज्या लोकांनी पंचांची भूमिका निभावली व पीडितांना शिक्षा ठोठावली त्यांना तातडीने अटक होऊन कडक कारवाई होणे आवश्यक आहे. पंचायतीत ‘कायदा’ नव्हे ‘शब्द’ चालतो!गोपाळ समाजात भरणाऱ्या जातपंचायतीचा ‘अजब’ न्यायनिवाडा वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. या पंचायतीत कायदा कुठेही गृहित धरला जात नाही. कायद्याऐवजी इथं फक्त पंचांचा ‘शब्द’ चालतो. ते सांगतील ती शिक्षा आणि करतील तो दंड. आत्तापर्यंत पंचांकडून बहुतेकांना फटके लगावण्याचीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेरलेतील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. या प्रकारावर त्यावेळी ‘अंनिस’नेही आक्रमक भूमिका घेत समाजाची बैठक आयोजित केली. पोलिसांसमोर झालेल्या बैठकीत यापुढे भागात जातपंचायत न भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच पाचवडमध्ये जातपंचायतीच्या अजब निवाड्याचा प्रकार समोर आला आहे. वास्तविक, पंचांच्या या निवाड्याचा फटका आजपर्यंत अनेक कुटुंबांना बसला आहे. मात्र, बहिष्कृत होण्याच्या भीतीने संबंधित कुटुंबे मूग गिळून गप्प आहेत. जिल्ह्यामध्ये हा समाज वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाला आहे. त्यातील मोजकी मंडळी एकत्रित करूनच पंचायतीची स्थापना केली जाते. पंच होण्यासाठी अनुभव व ज्येष्ठत्व एवढेच निकष लावले जातात. एखाद्या गावात समाजातील व्यक्तीने पंचायत बोलावलीच तर आसपासच्या गावातील पंचांनाही त्याठिकाणी बोलावून घेतले जाते. त्यानंतर पक्षकार व आरोपीच्या कुटुंबासमोरच न्यायनिवाडा करण्यासाठी पंचायत बसते. पक्षकाराचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन आरोपीला शिक्षा ठोठावली जाते. यामध्ये चोरी, मारामारी यासारखे किरकोळ गुन्हे असल्यास त्याला पाच फटक्यांची तर मोठा गुन्हा असल्यास दहा फटक्यांची शिक्षा दिली जाते. फटके देण्यासाठी वेत, निरगुडी किंवा इतर झाडांची ओली काठी वापरली जाते. संबंधिताला दंडही सुनावण्यात येतो. दंड ाची रक्कम पंचांच्या वाटखर्चीसाठी वापरली जाते.