शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आमटे यांना पी. डी. पाटील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: July 2, 2015 00:25 IST

कऱ्हाड : बाळासाहेब पाटील यांची माहिती

कऱ्हाड : सन २०१५ सालचा ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा मॅगेसेस अ‍ॅवॉर्ड विजेते व दिवंगत बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. कऱ्हाड येथे बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पी.डी. पाटील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, शिक्षण मंडळ कऱ्हाडचे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, ‘पी. डी. पाटील यांच्या कार्याच्या गौरवार्थ ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने २०११ पासून घेतलेला आहे. ज्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर नेली. अशा व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार हा मॅगेसेस अ‍ॅवॉर्ड विजेते आणि दिवंगत बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा आॅक्टोबर महिन्यात होणार असून, ५१ हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.यापूर्वी २०११ मध्ये पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, २०१२ मध्ये कोल्हापूर येथील अपंग समाजसेविका नसिमा हुरजूक, २०१३ मध्ये पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, २०१४ मध्ये मुंबई येथील पद्मभूषण पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. जेष्ठराज जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी दिली. (प्रतिनिधी)