शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकन पोपट हरवल्यानं मालकाचा अन्नत्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:53 IST

घरातील सदस्य गेल्यानं दु:ख; पोलीस ठाण्यातही धाव

- दत्ता यादव सातारा : शुद्ध इंग्रजीत बोलणाऱ्या पोपटाला त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा शिकवली. मालक आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं आणि पुढे त्यांचे जेवण होईपर्यंत खांद्यावर बसायचा हट्ट धरायचा, त्यांनी दिलेली फळं खायची.. कुटुंबातील व्यक्तीपेक्षा लळा लावणारा हा पोपट काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला आणि त्यांनी अक्षरश: अन्न त्यागाचा निर्णय घेतला.साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात राहणारे इम्तियाज सय्यद यांना पूर्वीपासूनच पक्षी पाळण्याचा छंद आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातून पन्नास हजार रुपयांना आफ्रिकन पोपट विकत घेतला. या पोपटाला केवळ इंग्रजी भाषा अवगत होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आफ्रिकन पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा अजिबात समजायची नाही. मात्र, तरीसुद्धा सय्यद यांनी पोपटाला आपली मातृभाषा शिकवण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यांत त्यांनी या पोपटाला हिंदी आणि मराठी भाषा शिकवली. इंग्रजीमध्ये पटाईत असलेल्या या पोपटाने कसलेही आडेवेडे न घेता सय्यद यांच्याकडून हिंदी भाषा अत्यंत चपलखपणे शिकली. चल आ जा, पानी पी, खाना खाने का वक्त हो गया. जल्दी चल, आगे जा के बैठ जा,’ असे बोलल्यानंतर आफ्रिकन पोपट त्यांचे ऐकून लगेच कृती करत होता.गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे शब्द पोपटाकडून ऐकले नाही तर सय्यद बैचेन व्हायचे. घरात गेल्यानंतर पोपट त्यांच्या खांद्यावर बसून त्यांचे स्वागत करायचा. सय्यद यांचे जेवण झाल्यानंतरच तो त्यांच्या खांद्यावरून उतरून फळे खात होता. सय्यद यांच्या मुलीचे लग्न झाल्यामुळे घरात पती-पत्नी असे दोघेच असल्याने ते पोपटाला घरातला तिसरा सदस्य मानायचे. दत्तक घेतलेला हा माझा मुलगा आहे, असे ते आपल्या ओळखीतील लोकांना आवर्जून सांगत होते. पाच वर्षे पोपटाच्या सहवासात कशी निघून गेली, हे त्यांना समजेलच नाही. मुलगी सासरी निघून गेल्याची कसर या पोपटाने भरून काढल्यामुळे त्यांना कधी मुलीची कमतरता भासली नाही. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन पोपट अचानक घरातून निघून गेला.  हे पाहून सय्यद यांना जबर मानसिक धक्का बसला. पोपटाला शोधण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. संपूर्ण सातारा त्यांनी पिंजून काढला. एवढेच नव्हे तर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आफ्रिकन पोपट हरवल्याची तक्रारही नोंदविली. तसेच सोशल मीडियावरही पोपट आणून देणाऱ्यास योग्य बक्षीसही दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतरही पोपट न सापडल्याने त्यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. 

माझ्या मुलाला मारू नकाइम्तियाज सय्यद यांनी सोशल मीडियावर सातारकरांना भावनिक साद घातली आहे. आफ्रिकन पोपटाच्या फोटोखाली त्यांनी हा माझा मुलगा घरातून निघून गेला आहे. तो कोणाला सापडल्यास त्याला मारू नका. तो तुमच्या खांद्यावर बसेल, त्याच्याशी प्रेमाने बोला, असे आवाहन त्यांनी केले आहे.