शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत वॉटर एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:00 IST

Water ATM Satara : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत:च मार्ग काढला आहे. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत वॉटर एटीएमधरणग्रस्तांचा पुढाकार : लोकसहभागातून साकारला पाणी प्रकल्प

सणबूर : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत:च मार्ग काढला आहे. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ झाले असून दहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्त कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. दहा वर्षे उलटूनही समस्यांचा फेरा न सुटल्याने अनेक अडचणींशी त्यांचा सामना सुरू असून अस्वच्छ पाणी पुरवठा ही त्यापैकीच एक समस्या आहे.गावच्या सार्वजनिक नळ योजनेची विहीर खळे गावाजवळ वांग नदीकाठावर असून गर्द झाडीमुळे पालापाचोळा तसेच पक्षी व वानरांची विष्टा पाण्यात पडून विहिरीतील पाणी अस्वच्छ होते. गावात निर्माण झालेला हा आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेवून तातडीने त्याची अंमलबजावणी केली. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने स्थानिकांसह आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, सहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रियांका वाघमोडे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर