शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाच्या वीज बिलात २०० युनिटचा जादा ‘प्रकाश’ : सातारा वीज वितरण कंपनी लूट करीत असल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:20 IST

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत.

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पाडला आहे.

गोडोली येथील माधुरी खंडूजी कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले. या बिलावर मीटरच्या फोटोमध्ये ३२४१ असे रिडिंग स्पष्ट दिसते. मात्र त्यावर असणाºया चालू रिडिंगच्या कॉलममध्ये ते ३४४१ असे नोंदविले आहे. मागील रिडिंग ३०२५ आहे.

प्रत्यक्षात चालू रिडिंग ३२४१ इतके असताना त्यापेक्षा २०० युनिट ज्यादा नोंदविण्यात आल्याने त्यांना ३ हजार ६४० इतके वीज बिल आले आहे. यामध्ये चुकीच्या नोंदीमुळे तब्बल १ हजार ६०० इतक्यारकमेचे बिल ज्यादा आणि बेकायदा आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेतली.

वीज कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आपली चूक कबूल करायलाही तयार नव्हते. त्यांनी बिलाच्या झेरॉक्स व इतर बाबींसाठी कुलकर्णी यांनाच धावाधाव करायला लावली. या प्रकारामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कºहाडातील वीज ग्राहकांना एलईडी बल्बचा ज्यादा आकारआला, फलटण तालुक्यातील शेतकºयाला वापर नसताना विजेचे भरमसाट वीज बिल आले, रोजच असे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. 

चूक वीज कंपनीची...पळापळ ग्राहकांचीमहावितरण कंपनीने केलेली चूक निस्तरण्यासाठी संबंधित ग्राहकांनाच हेलपाटे घालावे लागत आहेत. यात आर्थिक झळ तर बसतेच उलट मनस्तापही सोसावा लागत आहे.वीजबिल आॅनलाईन पद्धतीने आम्ही भरत होतो, अशा पद्धतीने ज्यादा आकारणीचे बिल दिले गेले असले तरी तेव्हा ते समजणे अवघड होते. काही दिवसांपूर्वी ही पद्धत बंद केली, त्यामुळे आता कुठे आमची होणारी लूट समोर आली.- चिन्मय कुलकर्णी, वीज ग्राहक