शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्काराबाबत पवारांसमोर ठाम जिल्ह्यातील आमदार आक्रमक : स्पष्ट म्हणाले, ‘आम्ही येणार नाही.. तुम्ही जावे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:42 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताºयात आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताºयात आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताºयाच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार जेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यात गुंतलेले होते. याचवेळी दुसरीकडे उदयनराजे हे भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् शिवसेनेचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडवर थांबले होते.

बारामतीतून निघालेले शरद पवार साताºयात आल्यानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रीती हॉटेलमध्ये दाखल झाले. पावणे तीन वाजता राष्ट्रवादीच्या मोजक्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह पक्षातील इतर स्थानिक नेते उपस्थित होते. शरद पवार उदयनराजेंच्या सोहळ्यास उपस्थित राहणार का, अशी चर्चा दिवसभर राहिल्याने या बैठकीकडे बाहेरील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, ही बैठक सुरू असतानाच उदयनराजे अकस्मातपणे याठिकाणी आले. पवार यांचे स्वागत करून ते पुन्हा निघून गेले. त्यानंतर इतर आमदारांची पवारांशी पुन्हा चर्चा सुरू झाली. यानंतर उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी हेलीपॅडवर प्रतीक्षा करू लागले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् साताºयाचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे हे होते. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे स्वागत करून उदयनराजे पुन्हा पवारांच्या बैठकीत आले.

राजेंशी चर्चा झाल्यानंतर शरद पवारही बैठकीतून उठले. त्यानंतर त्यांची गाडी कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाल्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा संपली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदार शरद पवार यांच्याशी कमराबंद चर्चा केली. तिसºया मजल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना दुपारी सव्वातीन वाजता खासदार उदयनराजे यांची एंट्री झाली. शरद पवार यांचे स्वागत करून त्यांच्याशी मोजका संवाद साधून उदयनराजे निघून गेले. त्यानंतर आमदारांशी त्यांनी चर्चा सुरू केली.कमराबंद चर्चेत व्यक्त झाली नाराजी...जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदार शरद पवार यांच्याशी कमराबंद चर्चा केली. साताºयातील एका हॉटेलच्या तिसºया मजल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना दुपारी सव्वातीन वाजता खासदार उदयनराजे यांची एंट्री झाली. शरद पवार यांचे स्वागत करून त्यांच्याशी मोजका संवाद साधून उदयनराजे निघून गेले. त्यानंतर विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादीचे इतर आमदार मंडळी दाखल झाले. कमराबंद चर्चेत उदयनराजेंबाबत नाराजी व्यक्त केल्याचे संकेत नंतर मिळालेच. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील विरोध, विधान परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाविरोधात घेतलेली भूमिका याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे सर्वांच्याच देहबोलीतून स्पष्ट झाले.उदयनराजे दोन वेळा पवारांना भेटीलाखासदार शरद पवार हॉटेलवर राष्ट्रवादीच्या आमदार व नेते मंडळींशी चर्चा करत असताना दुपारी सव्वातीन वाजता तिथे आले. पाच मिनिटे थांबले. ‘मुख्यमंत्री आल्यानंतर कळवा, आम्ही लगेच निघू,’ असे पवारांनी सांगितल्यानंतर उदयनराजे निघून गेले. मुख्यमंत्री आल्यावर पुन्हा सायंकाळी पाच वाजता उदयनराजे हॉटेलवर आले. पाच मिनिटांत बाहेरही पडले. त्यांच्या मागून शरद पवारही निघून गेले. त्यानंतरही राष्ट्रवादीचे आमदार मंडळी त्याच ठिकाणी बसून राहिले होते. त्यानंतर त्यांच्यात खलबते रंगली होती. सोहळ्याकडे जाणार का? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर बहुतेकांनी लग्नाची निमंत्रणे असल्याचे सांगितले.