शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

कास संपर्क क्षेत्राबाहेर : मोबाईल कॉल करण्यासाठी कोण झाडावर तर कोण दुचाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:03 IST

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला ...

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला रेंज नसल्याने महत्त्वाचे निरोप द्यायचे असल्यास पर्यटकांना मोबाईल घेऊन रेंजचा शोध घ्यावा लागतो. यासाठी काहीजण झाडावर चढतात तर कोण दुचाकीवर उभा राहतो. खूप प्रयत्नानंतर रेंज आल्यावर त्यांना हायसे वाटते.चोहोबाजूने वेढलेल्या डोंगररांगा, त्यात दाट झाडी यामुळे हिवाळा तसेच पावसाळ्यात दाट धुक्यात हरवून जाणारे कास पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हिरवागार निसर्ग आजही साद घालत असल्याने पर्यटक येतात; परंतु मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क साधण्यासाठी रेंजच्या शोधात फिरावे लागते.कास तलाव परिसरात काही तुरळक ठराविक रेंज येते. मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले कास तलाव कायम ‘नॉट रिचेबल’ लागते. संपूर्ण जग इंटरनेटने व्यापले असले तरी सातासमुद्रापार ओळख असणाऱ्या कासला रेंजअभावी फोनही लागत नाही. या परिसरात पर्यटकांची हजारो रुपयांच्या भारी स्मार्टफोनचे एक प्रकारचे खेळणेच बनते.फुलांचा हंगाम वगळता पर्यटकांची कास तलावावर निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. येथील नयनरम्य नजराणा जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी अनेक कुटुंब तसेच तरुणाई कास तलावावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. येथे आल्यावर फोनला रेंजच मिळत नाही.तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हवर फोटोसेशन, पावसाळ्यात निसरड्या किनाºयावर गाडी घेऊन जाणे, किनाºयावर फोटोसेशन करत तरुणाईमध्ये होणारी हुल्लडबाजी चालते. परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकाला नातेवाइकांना इमर्जन्सी कॉल करावयाचा म्हटले तर रेंज मिळत नाही. ३१ डिसेंबर, गेट टुगेदर, विकएंड तसेच वर्षभर बहुतांशी वेळेला ओल्या पार्ट्यांचा परिसरात बेत आखला जातो. संगीताचा ठेका धरत मद्याचे पेग रिचवत हुल्लडबाजी करणाºया तरुणाईमध्ये अनेकदा हाणामारीत रुपांतर होते. अनुचित प्रकार अथवा अपघात घडल्यास परिसरात जवळपास पोलीस चौकी नसल्याने कॉल होऊ शकत नाही.