पेट्री : शहराच्या पश्चिमेला कास, बामणोली, जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे ओळखली जातात. या पर्यटनस्थळी जाता येता यवतेश्वर घाट रस्ता लागतो. या घाट रस्त्यावरून साताराकडे येताना सर्रास वाहनचालक या धोकादायक वळणावरून आऊट आॅफ मारण्याचा जीवघेणा खेळ करत पेट्रोल बचत करताना दिसत आहेत. परंतू यामुळे वाहनाचे नुकसान होवून चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला अशी परिस्थिती उद्भवते आहे.कास पठार, कास तलाव, बामणोली या परिसरात पर्यटक, महाविद्यालयीन तरूणाईची नेहमीच वर्दळ असते. सध्याच्या कास पठारावरील फुलांचा हंगाम जिल्हा व परजिल्ह्यातील पर्यटकांना आकर्षुन घेवू लागला आहे. तसेच पश्चिमेकडील पावसाचा जोर पाहता यवतेश्वर घाट रस्त्यावरून पाण्याबरोबर माती, छोटी मोठी खडी पसरलेली दिसून येते. सध्या या परिसरात दाट धुके पसरत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज यावा यासाठी वाहनांचे प्रकाश दिवे चालू ठेवावे लागत आहेत. आऊट आॅफ मारल्यावर प्रकाश दिवे बंद राहतात. तरीही या रस्त्यावरून हुल्लडबाजी करणारी तरुणाई ट्रिपलसीटवरून मोबाईलचा वापर करत आऊट आॅफ मारताना दिसत आहे. याला चारचाकी वाहनांचा देखील अपवाद वगळता येत नाही. यामुळे तीव्र उतारावर वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होवून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पेट्रोल बचतीसाठी मारलेल्या आउट आॅफमुळे सतत ब्रेक दाबावा लागत असल्याने वाहनाचे लायनर खराब होणे, तसेच बऱ्याचदा क्लज दाबून गेर मध्ये आऊट आॅफ मारल्याने क्लजप्लेट लोखंडी प्लेटवर घासणे, वॉल बेंड होवून वाहनाचे नुकसान पेट्रोल खचार्पेक्षा अधिक होतो. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी देखील मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाश झोतावर तसेच इंडिकेटरवर वाहने यवतेश्वर घाटातून सातारकडे आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शनिवार, रविवार अथवा जोडून सुटी आली असता यवतेश्वर घाटातील धबधब्यावर कुंटूबासमवेत पर्यटकांची अधिक गर्दी असते तसेच या ठिकाणी वानरांचा देखील मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यावेळी दूचाकी वाहनांवर आऊट आॅफ मारून स्टंटबाजी करणाऱ्याच्यांत मोठे प्रमाण दिसून येते. यामुळे एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत महिन्यात येथे वानराचा वाहनाला धडकून अपघातात मृत्यु झाला होता. (वार्ताहर)आऊट आॅफ एक फॅशनचार कि.मी अंतर आऊट आॅफ मारून वाहन समर्थ मंदिर राजवाडा मार्गे आर्यांग्ल तसेच ेकार्यालयापर्यंत, तसेच समर्थ मंदिर पासून फूटका तलाव मार्गे मोती चौकापर्यंत पोहचवले जाते.परंतु वाहने स्टार्ट करावी लागू नयेत यासाठी रहदारीच्या गर्दीतूनही वेग कमी न करता आहे तोच वेग कायम ठेवून मार्ग काढला जात आहे. तसेच बोगदा परिसरातून डाव्या बाजूने मंगळवार तळ्यापर्यंत गाडीचा आउट आॅफ मारला जात असल्याने सकाळ, संध्याकाळ शालेय विदयार्थ्यांची या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आऊट आॅफ मारण्यापेक्षा उतारावर चालू गाडी ठेवून चालवली असता पेट्रोल कमी लागते. तसेच चारचाकी वाहनांमध्ये जून्यातली व्हॅन, कार वगळता अन्य चारचाकी वाहनांना आऊट आॅफ बसत नाही. - विकास मिस्त्री, सातारा
येवतेश्वर घाटात जीवघेणा ‘आऊट आॅफ’!
By admin | Updated: August 18, 2015 22:22 IST