शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा 'एकला चलो'ची भूमिका घेणार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा

By दीपक देशमुख | Updated: April 12, 2023 15:59 IST

सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही.  सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर ...

सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही.  सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर स्वबळावर लढवू शकतो. साताऱ्यात किमान चार-पाच नगरसेवक निवडून आणण्याची आमची ताकद आहे. त्यामुळे सोबत घेतलं तर लढू अन्यथा एकला चलो अशी भूमिका घेणार आहे, अशी परखड भूमिका रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली. सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साताऱ्यात  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव  साजरा होणार असल्याचे सांगून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार असल्याचे सांगितले.दरम्यान युतीबाबत बोलताना गायकवाड म्हणाले,  आमच्या ताकतीनुसार आम्हाला जागा द्याव्यात. युती झाल्यापासून त्यांना आम्ही वारंवार आवाहन करत आहोत. मात्र कसलीही चर्चा करत नाहीत. आमची युती नेमकी कसली आहे तेच कळेना. फक्त आमच्या साहेबांची तेवढी युती दिसत आहे. जर सन्मानपूर्वक सोबत घेतले नाही तर ऐनवेळी मी युती तोडतो.  राष्ट्रवादीला आणि काँग्रेसलाही याचा अनुभव आहे. त्यामुळे आमच्या  नादाला लागू नका, असा इशाराही गायकवाड यांनी भाजपाला दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर