पाटण : तालुक्यातील सहकारी बँका, पतसंस्था, सोसायट्या यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पाटण येथील सहायक निबंधक कार्यालयाची गेल्या कित्येक वर्षांपासून केविलवाणी अवस्था आहे. ती आजही जैसे थे असून, या कार्यालयात अधिकाऱ्यांसह केवळ चारजणच तालुक्यातील पावणे दोनशे सहकारी संस्थांचा रिमोट सांभाळत आहेत. पाटण तालुक्यात सहकारी साखर कारखाना, तीन नागरी बँका व पतसंस्था आणि सोसायट्यांचे जाळे आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा भागविल्या जातात. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना, शिवदौलत सहकारी बँक, पाटण अर्बन बँक यांच्यासह अनेक पतसंस्था नावारूपाला आलेल्या आहेत. मात्र, संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सहायक निबंधक कार्यालयाचा कारभार कर्मचाऱ्यांअभावी ढेपाळलेला आहे. या कार्यालयात सध्या एक सहायक निबंधक, सहकारी अधिकारी वर्ग १ आणि वर्ग २ व कनिष्ठ लिपिक असे चारजणच कारभार पाहतात. तालुक्याच्या ढेबेवाडी, कोयना, मोरणा, तारळे, चाफळ या भागांतून या कार्यालयात आलेला संस्था कर्मचारी तत्पर सेवेअभावी कंटाळून जातो. कधी-कधी हेलपाटे मारतो; पण बोलायचे कुणी. गैरसोयीबद्दल बोलायचे तर कारवाईची भीती. त्यामुळे सहन करणे हाच मार्ग अनेकजण पत्करतात. पाटण तालुक्यातील ४८ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मग मेळ कसा साधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांना या संस्थेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)य्सहायक निबंधक कार्यालयाच्पाटण तालुक्यात ६६ पतसंस्था, १०३ सहकारी सोसायट्या असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास सहायक निंबधक कार्यालयात अजुनही आठ पदे अपेक्षित आहेत. सध्या ४ कर्मचारी कार्यरत असून चांगला कारभार सुरू आहेविलास जाधव, सहाय्यक निबंधक, पाटणाी स्थितीाा कार्यालयात संस्था सहायक निबंधक, सहकारी वर्ग १ व वर्ग २ अधिकारी आणि मुख्य लिपिक अशी आठ पदे रिकामी आहेत. तालुक्यात ६६ पतसंस्था, १०३ सोसायट्या, नागरी बँका अशा दोन आणि इतर अशा पावणे दोनशे सहकारी संस्था कार्यरत आहेत.
संस्था शेकडोत; कर्मचारी मात्र चारच!