शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान--डोळे, किडनी, हृदय, लिव्हरमुळे दुसºया रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:41 IST

शामगाव : अवयवाच्या रुपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत

ठळक मुद्देनिगडीतील दाम्पत्याचा निर्णय;

लोकमत न्यूज नेटवर्कशामगाव : मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्यूचं डोंगराएवढं दु:ख बाजूला सारून या कुटुंबाने त्याचे अवयव दान केले. मुलाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या अवयवाच्या रुपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत या कुटुंबाने हा आदर्शवत निर्णय घेतला.

कºहाड तालुक्यातील निगडी गावातील चंद्रकांत घोलप हे अल्पशिक्षित. शेती करायची म्हटलं तरी क्षेत्रही अल्प. त्यामुळे कंपनीत नोकरी करून चंद्रकांत हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. काही वर्षांपूर्वी ते पत्नी कुसूम व तीन आपत्यांसह उदरनिर्वाहासाठी मध्यप्रदेशला गेले. काही वर्षांनी संबंधित कंपनी बंद पडली. अखेर पुन्हा हे कुटुंब मध्यप्रदेशातून नाशिकला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत व कुसूम यांनी दोन मुले व मुलीला शिकवले. चंद्रकांत व कुसुम यांचा धाकटा मुलगा लोकेश यानेही उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोही नवी मुंबईला भावाकडे राहण्यास गेला. त्याठिकाणी एक कंपनीत इंजिनिअर पदावर काम करीत होता.

गुरुवारी लोकेश कार्यालयाला जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्रही त्याला घेण्यासाठी घरापर्यंत आला. दोघेजण दुचाकीवरून कंपनीत जाण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. तेथील वाहतूक पोलिसांनी लोकेशला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीन दिवसांनी डॉक्टरांनी लोकेशचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.लोकेशचे अवयव दान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुबीयांना दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असतानाही यावर विचार करून लोकेशच्या आई, वडील बहीण व भाऊ यांनी लोकेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. 

माझ्या मुलाच्या अवयवांमुळे चार जणांना जीवदान मिळाले. अवयव दानाचा निर्णय माझ्यासह कुटुंबीयांसाठी खूप अवघड होता; पण लोकेशच्या अवयवांमुळे आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, या जाणिवेतून आम्ही हा निर्णय घेतला.- चंद्रकांत घोलप,लोकेशचे वडील