शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी आधी डोकं तपासून घ्यावं, जयकुमार गोरे यांचीही जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:07 IST

भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं, अशा शब्दात  माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देविरोधकांनी आधी डोकं तपासून घ्यावं, जयकुमार गोरे यांचीही जोरदार टीकामाझ्याविरोधात ठराव करणारे सर्वजण अदखलपात्र

दहिवडी : भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं, अशा शब्दात  माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

जयकुमार गोरे यांना जनाधार राहिला नसल्यामुळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणूनच ते भाजप प्रवेशासाठी धडपडत आहेत. जनाधार नसलेल्या गोरेंना भाजपने पक्षात घेऊ नये, असे मत व्यक्त करणाऱ्या भाजपचे माण- खटाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांना  माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही जोरदार टीका केली आहे.  गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.

मी भाजपमध्ये जाणार असं त्यांना कोणी सांगितलं. भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं. माझ्याविरोधात ठराव करणारे सर्वजण अदखलपात्र आहेत. माझं नाव घेण्याचा अधिकार तरी त्यांना आहे का ? त्यांनी पहिल्यांदा स्वत:चं अस्तित्व पहावं. गावात त्यांची लायकी आहे का हे ही बघावं, अशा शब्दात  माणचे आमदार जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली.

दहिवडी येथील भाजप पक्ष कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, उपाध्यक्ष विजयकुमार साखरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब खाडे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वल काळे, सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विजय टाकणे, अशोक पवार, संतोष हिरवे, सचिन लोखंडे, वसंत शिर्के, पिंटू जगदाळे, हाणमंत तरटे, बापुराव नलवडे, पोपट काळेल, बालेखान मुलाणी आदी  पराभव दिसत असल्याने जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करण्यासाठी धडपत आहेत,अशी टीका केली  होती.

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेSatara areaसातारा परिसर