शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छबिना मिरवणुकीत मल्लखांबाची प्रात्यक्षिके-सातारा तालुक्यातील आरे गावात नवा पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:58 IST

स्वप्नील शिंदे ।सातारा : सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्रेनिमित्त निघणाऱ्या छबिन्यामध्ये बँड, लेझीम आणि झांजपथकाच्या तालावर नृत्य सादर केले जाते. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा तालुक्यातील आरे गावात पारंपरिक छबिन्यामध्ये मुलांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.सातारा तालुक्यातील आरे हे कर्नल संतोष महाडिक यांचे ...

ठळक मुद्देनव्या पिढीपुढे आदर्श :

स्वप्नील शिंदे ।सातारा : सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्रेनिमित्त निघणाऱ्या छबिन्यामध्ये बँड, लेझीम आणि झांजपथकाच्या तालावर नृत्य सादर केले जाते. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा तालुक्यातील आरे गावात पारंपरिक छबिन्यामध्ये मुलांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.सातारा तालुक्यातील आरे हे कर्नल संतोष महाडिक यांचे गाव. या गावात अनेक तरुण सैन्यात नोकरी करतात. त्यापैकीच एक असलेले माजी सैनिक आणि सध्या सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे हवालदार भरत महाडिक यांच्या पुढाकाराने गावात मल्लखांब खेळ रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांना गावातील शिवतेज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर जगदाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. गेल्या दोन वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मल्लखांबाच्या कवायती सुरू आहेत. विद्यालयातील साधारण २० ते २५ विद्यार्थी दररोज मल्लखांबाचा सराव करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात होणाºया विविध स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत आहेत. राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवत असताना आपली कला गावातील लोकांना दाखवण्याची इच्छा भरत महाडिक व खेळाडूंना होती.गेल्या आठवड्यात गावात ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा होती. या यात्रेत आपले मल्लखांब खेळाचे कौशल्य दाखवण्याचे ठरवले. त्यानुसार यात्रेच्या छबिन्यामध्ये सर्वजण सहभागी झाले. त्यावेळी छबिना गावातील मुख्य चौकात आला असताना खेळांडूनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यास सुरुवात केली. प्रात्यक्षिके पाहून ग्रामस्थांच्या डोळ््याचे पारणे फिटले. यात्रेच्या छबिन्यात या मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा नवा पायंडा पाडून ग्रामस्थांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.२५ खेळाडू सहभागीएक तास मल्लखांबाचे प्रात्यक्षिकेचखेळाचे २२ प्रकार केले सादर२५ खेळाडूंचा सहभागग्रामस्थांकडून ५ हजार रुपयांचे बक्षीसखेळाडूंना शाळेत मोफत प्रशिक्षणशाळेच्या आवारात दररोज दोन तास सरावमी स्वत: मल्लखांब खेळाडू असल्याने त्याबद्दल मला आकर्षण होते. मात्र, हा खेळ कमी होत असल्याचे पाहून दोन वर्षांपासून पुन्हा खेळ रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला ग्रामस्थांनी साथ दिल्याने मल्लखांबाला प्रतिष्ठा मिळाली आहे.-भरत महाडिक, पोलीस हवालदार व मल्लखांब प्रशिक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा