शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बलुनफिस्टामध्ये सातारकर कॅप्टनला कर्तृत्वची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:47 IST

संग्राम पवार यांनी ओमानच्या इतिहासात पहिला गरम हवेचा बलून उडविणारा पायलट होण्याचा बहुमान यापूर्वीच पटकाविला आहे. कॅप्टन संग्राम पवार हे पुण्यातील कामशेत व लोणावळा या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाºया परिसरात गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी आॅक्टोबर ते एप्रिल या काळात बलून रायडिंगचे प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत.

ठळक मुद्देसंग्राम पवार यांची निवड । ५ ते १३ आॅक्टोबर दरम्यान होणार फिस्टा

सातारा : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय बलुनफिस्टामध्ये साताऱ्यातील कॅप्टन संग्राम पवार हे भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. दि. ५ ते १३ आॅक्टोबर या कालावधीत अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय न्युमेक्सिकोमधील ४८ व्या अल्बुकर्क बलुनफिस्टामध्ये पवार यांना ही संधी मिळणार आहे.

संग्राम पवार यांनी ओमानच्या इतिहासात पहिला गरम हवेचा बलून उडविणारा पायलट होण्याचा बहुमान यापूर्वीच पटकाविला आहे. कॅप्टन संग्राम पवार हे पुण्यातील कामशेत व लोणावळा या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाºया परिसरात गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी आॅक्टोबर ते एप्रिल या काळात बलून रायडिंगचे प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत.एआयबीएफ हा जगातील सर्वात मोठा हॉट एअर बलून मेळावा आहे. यामध्ये २५ देशांमधील ६५० हून अधिक पायलट ५५० बलून सहभागी होत आहेत. यात जगातील विविध देशांतून १० लाखांहून अधिक पर्यटकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.कॅप्टन संग्राम पवार यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील पवारवाडी हे असून, ते साताºयाचे सुप्रसिद्ध कुस्तीपटू दिवंगत श्रीरंग जाधव यांचे नातू, सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रकाश पवार यांचे चिरंजीव आहे. तसेच पुणे येथील नितीन शितोळे (सरकार) यांचे ते जावई आहेत. संग्राम पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.

मला सुरुवातीपासूनच धाडसी खेळांची आवड आहे. माझ्या कुटुंबीयांनीदेखील माझ्यातील सुप्त गुणांना नेहमीच वाव दिला. इतरांपेक्षा काही वेगळं करून दाखविण्याचं साहस मला आहे.- संग्राम पवार, कॅप्टन

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAmericaअमेरिका