शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्त्याच्या मध्यभागी ‘पोल’ खोल!

By admin | Updated: February 20, 2015 23:10 IST

वाहनचालकांची त्रेधातिरपीट : साताऱ्यातील रस्त्यांवर तब्बल २८ खांबांचा खो-खो

दत्ता यादव - सातारा  -शहराचा विस्तार होण्यापूर्वी ‘वीजवितरण’तर्फे रस्त्याच्या कडेला विद्युत पोल उभारण्यात आले. मात्र, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या जसजसी वाढली, तसे रस्ते अपुरे पडू लागले. सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता ते रस्त्यातील विद्युत पोलचा. जवळपास शहरात सध्या २८ असे अडथळा ठरणारे पोल आहेत. हे पोल काढण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. हे पोल काढले तर रस्ते अगदी ऐसपैस होतील. सुरक्षित वाहतुकीसाठी ‘पोलमुक्त रस्ता अभियान’ राबविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला नुकत्याच दिल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी शहर व परिसरामध्ये फेरफटका मारून रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या पोलची संख्या मोजली. वाहनांना अडथळा ठरणारे २८ पोल निदर्शनास आले. परंतु आणखी असे बरेच पोल आहेत. मात्र, ते पोल टेलिफोन विभागाचे आहेत. हे पोलही काढणे गरजेचे आहे. अनेकदा रात्री-अपरात्री पोलवर वाहने धडकून अपघात झाले आहेत. काहीजण जायबंदी झाले, तर काहीजणांना चक्क आपला जीवही गमवावा लागला आहे. काही वर्षांपूर्वी समर्थ मंदिर येथे रस्त्यामधील पोलमुळे एका शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. ट्रक चालकाला समोरचा पोल दिसला नाही. अचानक पोल आडवा आल्यामुळे त्या ट्रक चालकाने ट्रक दुसरीकडे वळविला. त्यावेळी शाळकरी मुलगी तेथून पायी निघाली होती. त्या ट्रकने मुलीला धडक दिली. तिला रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडतात; परंतु केवळ पोलमुळे अशी घटना घडली असेल तर नेमका दोष कोणाला द्यायचा, अशी स्वत: ची समजूत घालून नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. पालिकेने ही पोलमुक्तीची मोहीम हाती घेतल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात लोखंडी पोलमध्ये अचानक विद्युत प्रवाह जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला होता. पालिकेने हाती घेतलेली ही मोहीम पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. शाळेतून घरी रस्त्याने चालत जात असताना अनेक मुले खांबांना हात लावतात. अशावेळी जर त्यातून विद्यूत प्रवाह पोलमध्ये असेल तर जीव जाण्याचीही शक्यता आहे. तसेच सायकलवरून जात असताना मुले खांबांनाही धडकून अपघात झाले आहेत. त्यामुळे पोलीमुक्ती गरजेचीच आहे.म्हणे सर्व्हे करायला लागेल...शहरामध्ये पोलमुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला तरी ‘एमएसईबी चे अधिकारी आणि कर्मचारी मात्र यापासून अनभिज्ञ आहेत. रस्त्यामधील पोल कायमस्वरूपी काढायचे असतील तर पहिल्यांदा सर्व्हे करावा लागेल. त्याला वरिष्ठांची मंजुरी लागते. त्यानंतरच हे रस्त्यामधील पोल काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आमच्यापर्यंत हा प्रस्ताव आल्यास पोलमुक्तीसाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू. परंतु त्याला नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही एमएसईबीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.