शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी !

By admin | Updated: January 10, 2016 00:50 IST

वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी ! नावेचीवाडी ठेका : वाई पालिकेचा ठराव नसतानाही परस्पर दाखला; जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे तक्रार येताच यंत्रणा खडबडून जागी

सागर गुजर ल्ल सातारा सातारा : वाई शहरालगत कृष्णा नदी तीरावर असणाऱ्या नावेचीवाडी येथील वाळू उपसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथून वाळू उपसा करण्यास वाई नगरपालिकेने नव्हे, तर चक्क नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी ‘ना हरकत दाखला’ दिला. नगराध्यक्षांच्या सहीचा हा ना हरकत दाखला ‘व्हॉटस अ‍ॅप’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यापर्यंत पोहोचल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी त्यांच्या लेटरपॅडवरून २३ जून २0१५ मध्ये हा दाखला दिला आहे. ‘मागणी केलेवरून दाखला देणेत येतो की, शेतजमीन रि. स. नं. १४६/२, नावेचीवाडी, वाई क्षेत्र व त्याशेजारील क्षेत्रामध्ये वाळू साठा आहे. तरी या क्षेत्रामधील वाळू साठा उपसणेकामी लिलाव पद्धतीने कृष्णा नदीमधील वाळू साठा उपसण्याबाबत नगरपरिषदेची हरकत नाही, हा ना हरकत दाखला दिला असे,’ हे या दाखल्यात नोंद करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या १२ मार्च २0१३ च्या अद्यादेशानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत वाळू उपशाचा ठेका द्यायचा झाल्यास त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ना हरकत असल्याचा विषय मंजूर करायचा असतो. शहर परिसरात पालिकेने सभा घेऊन हा विषय मंजूर करणे आवश्यक आहे. दरम्यान, वाई पालिकेने असला कोणताही ना हरकत दाखला दिला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मग नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी स्वत:च्या लेटरपॅडवर असा दाखला देण्यामागे त्यांचा काय उद्देश होता?, नावेचीवाडीतला वाळू उपसा तेथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या ठरावाने सुरू झाल्याचे जिल्हा गौण खनिज विभागाने स्पष्ट केले आहे. कृष्णा नदीवर ज्या ठिकाणी वाळू उपसा सुरू होता, तेथून वाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा जॅकवेल जवळ आहे. उपशामुळे पाणी दूषित झाले. वाई शहरात काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.