शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

Ladki Bahin Yojana: सातारा जिल्ह्यात आठ लाखांवर अर्ज मंजूर, किती बहिणींनी नाकारला लाभ.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: January 23, 2025 12:27 IST

जानेवारीचा हप्ता लवकरच

नितीन काळेलसातारा : निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू असून, शासनाकडूनही याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मात्र, याला सातारा जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद असून, आतापर्यंत फक्त तीन महिलांनी लाभ नाकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही आठ लाखांवर ‘लाडक्या बहिणी’ आहेत.मागील वर्षी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरू केली. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत सहा हप्ते बहिणींना मिळाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने बहिणींना दीड हजारावरून २ हजार १०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीला सत्ता देण्यात ही योजनचा गेमचेंजर ठरल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता निकषात न बसताही लाभ घेतल्याने अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. तसेच निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांनी योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रतिसाद आहे.जिल्ह्यातील तीन महिलांनी योजनेतून बाहेर पडण्याबाबत अर्ज केला आहे. या महिला सातारा, फलटण आणि कोरेगाव तालुक्यातील आहेत. यामधील दोघींनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतला. पण, आता शासकीय नोकरीत निवड झाल्याने त्यांनी लाभ नाकारला आहे. त्यांनी लाभ मिळालेली रक्कमही परत केली आहे. तसेच एका महिलेने वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर असल्याने लाभापासून दूर राहण्याबाबत अर्ज केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिघी बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे. तरीही पुढील काळात तपासणी झाल्यास अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र ठरू शकतात.

सातारा जिल्ह्यातील माहिती..

  • योजनेसाठी अर्ज प्राप्त - ८,३३,२१३
  • अर्ज मंजूर - ८,१९,५४९
  • नामंजूर - २,०३५
  • प्रलंबित तपासणी अर्ज - २,७१३
  • योजनेचा लाभ - २१ ते ६५ वयोगटातील महिला 

..हे अपात्र ठरणार

  • अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
  • चारचाकी वाहन असणे
  • लग्नानंतर इतर राज्यात वास्तव्य

जानेवारीचा हप्ता लवकरचराज्य शासनाने जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे. २६ जानेवारीपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. पण, २ हजार १०० रुपये देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे दीड हजार रुपयेच मिळणार आहेत.

तालुकानिहाय अर्ज मंजूरतालुका - मंजूर अर्जजावळी - ३०,७६४कऱ्हाड - १,५३,३९५खंडाळा - ३८,६५३खटाव - ७९,१५९कोरेगाव - ७२,७२८महाबळेश्वर - १६,८९२माण - ६२,६५६पाटण - ८६,९६१फलटण - ९५,९५६सातारा - १,२७,०८९वाई - ५५,२६६

टॅग्स :Satara areaसातारा परिसरladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा