शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:47 IST

महाविकास आघाडी सरकारला थेट लक्ष्य केले

सातारा : ‘निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांनी केवळ इच्छा न बाळगता मतदारांचा कल जाणून घ्यावा आणि तयारी सुरू करावी. केवळ बिले काढणाऱ्यांनी आमच्यासोबत येऊच नये,’अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी दुपारी साताऱ्यात आयोजित एका बैठकीत नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देतानाच आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबल्या असल्या तरी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून लढायचे की अन्य पद्धतीने, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच घेतला जाईल. नगरसेवकाच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, नगरसेवक हा जनतेची मोठी कामे करणारा असावा, केवळ घरासमोरील बारीक कामे करणारा नसावा. केवळ कामाची बिले काढणाऱ्यांनी आमच्या सोबत येऊच नये. निवडणुकीत अधिकृत एकच उमेदवार असतो, त्यामुळे ज्यांना कुणाला संधी मिळेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे रहावे.कोणत्याही प्रकारची रणनीती ठरविण्यासाठी अथवा एकट्याने ठोस भूमिका घेण्यासाठी ही बैठक बोलाविली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला माजी पक्षप्रतोद अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, धनंजय जांभळे, अविनाश कदम, दत्ताजी थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या काळात काम नाही...राजकीय फटकेबाजी करताना शिवेंद्रसिंहराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या काळात कोणतेही ठोस काम झाले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे किमान त्या काळात सातारा शहराची हद्दवाढ होऊ शकली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले..

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्याशी सल्लामसलत करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय घेऊ
  • या निवडणुकीत तरुण उमेदवारांना संधी दिली जाईल, परंतु जुन्या, अनुभवी कार्यकर्त्यांना डावलणार नाही
  • भारतीय जनता पार्टी आणि आपल्यामध्ये नवीन-जुनं असं काहीही नाही. प्रत्येकाने एक दिलाने काम करावे
  • जिल्हा परिषद आपल्या विचाराची करायची आहे. आपल्याला सर्व जाती-धर्माचे उमेदवार निवडून आणायचे आहेत.
  • ८४ एकर क्षेत्रावर नवीन आयटी पार्क उभे राहणार असून, त्याची अधिसूचना लवकरच निघेल
English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Shivendrasinharaje Bhosle cautions workers ahead of upcoming elections.

Web Summary : Minister Shivendrasinharaje Bhosle urged workers to gauge voter sentiment and prepare for upcoming Satara municipal elections. He emphasized selecting candidates based on merit, not just bill generation, and prioritizing public service. He also criticized the previous government's lack of development.