शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

उरले अवघे ३३ टीएमसी पाणी

By admin | Updated: June 28, 2014 00:33 IST

सातारा जिल्हा : उरमोडी, तारळी वगळता कोठेही समाधानकारक साठा नाही

सातारा : सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे धरणांच्या जिल्ह्यात अवघे ३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी आणि पाटण तालुक्यातील तारळी प्रकल्प सोडला तर अन्य प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्याची एकूण पाणीसाठवण क्षमता २३0 टीएमसीहून अधिक आहे तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पाचशे टीएमसीच्या आसपास आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात फक्त १४.५४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा ३५.६५ टीएमसी इतका कमी आहे. विशेष म्हणजे कोयना धरणात उपलब्ध असणाऱ्या १४.५४ टीएमसीपैकी ७ टीएमसी पाणीसाठा मृत आहे.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर, नागेवाडी, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, तारळी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी तर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणारी वीर, भाटघर ही प्रमुख धरणे आहेत. इतर लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलावांची संख्या अधिक आहे. या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २३0 टीएमसीहून अधिक आहे. आजमितीस विचार करता यापैकी फक्त ३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या दिवशी सर्वच धरणांमध्ये ८२ टीएमसी इतका पाणीसाठा होता.उरमोडी आणि तारळी धरण वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडले तर भयंकर अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पावसानेही जिल्ह्यात दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. बहुतांशी भागात पेरण्या झाल्या असल्यातरी त्या ठिकाणीही आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षात आजअखेर ७९७ मि.मी. पाऊस झाला असून तालुकानिहाय सरासरी ७२.५ मि.मी. इतकी आहे. (प्रतिनिधी)