सातारा : कमी कष्टात व कमी वेळेत बक्कळ पैसा कमविण्यचे भलते वेड लागल्याने झडपट लॉटरीच्या आमिषने तरुणांची आॅनलाईन लॉटरी सेंटरवर होणाऱ्या गर्दीचे शहरातील चित्र आता ग्रामीण भागातही दिसू लागले आहे. सातारा तालुक्यातील अनेक मोठ्या बाजारपेठांच्या गावांत दोन-तीन आॅनलाईन लॉटरी सेंटर झाली असून, तेथे दिवसभर तहानभूक हरवून रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या तरुणांना हे झटपट श्रीमंत होण्याचे लागलेले वेड चिंताजनक बनले आहे.सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन लॉटरी सेंटर सुरू असून, तेथे कमी वेळात आणि विना कष्टाने पैसे मिळविण्याच्या आमिषाने मोठी गर्दी दिसत आहे. त्यामध्ये युवकांची अधिक संख्या आहे. जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड तालुक्यातील उत्तर व दक्षिणेतील भागातील बाजारपेठांच्या गावातही आॅनलाईन लॉटरी सेंटर सुरू झाली आहेत.सध्या आॅनलाईनचा जमाना सुरू आहे. सर्वच क्षेत्रात इंटरनेटमुळे क्रांती झाली असताना लॉटरी, उद्योगातही संगणकीय आविष्कार बघायला मिळत आहे. एकीकडे मटका व जुगार हे अवैध व्यवसाय सुरू झाले. केवळ विश्वास हाच एक प्रमुख मुद्दा घेऊन मटका व्यवसाय कित्येक वर्षे सुरू आहे. कागदाच्या एका छोट्या चिठ्ठीवर आकडे लिहून दिवसातून दोनवेळा निकाल लागणाऱ्या या धंद्याला आता आॅनलाईन लॉटरीशी स्पर्धा करावी लागत आहे. शहरी भागासह ग्रामीण वर्दळीच्या ठिकाणी या केंद्रांना सुगीचे दिवस आले आहेत. युवक वर्ग त्यामुळे भरला जात आहे. (प्रतिनिधी) माझा नंबर कधी येणार..कमी पैशावर जादा पैसे मिळविण्याचा हा खेळ सट्टा लावण्यासारखाच आहे. कमी कष्टात व कमी वेळेत भरपूर पैसा मिळण्याच्या आशेवर अनेकजण हा खेळ खेळतात. या खेळात झटपट लॉटरी अशी ओळख असली तरी लॉटरी नेमकी कधी लागणार, या प्रतीक्षेत अनेक युवक काहीही कामधंदा करत नाहीत. त्यामुळे युवा वर्गाचा झटपट श्रीमंत होण्याकडे कल आहे. अनेक युवक अक्षरश: कंगाल झाले आहेत.
ग्रामीण भागातही आॅनलाईन लॉटरीचे मायाजाळ
By admin | Updated: November 28, 2014 00:14 IST