शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनची सक्ती; तरीही पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला असून, हा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांना आॅनलाईन बुकींगची सक्ती करण्यात आली आहे. असे असूनदेखील देश-विदेशातील पर्यटक कासला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. चालू हंगामात हजारो पर्यटकांनी पुष्पपठाराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद ...

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला असून, हा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांना आॅनलाईन बुकींगची सक्ती करण्यात आली आहे. असे असूनदेखील देश-विदेशातील पर्यटक कासला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. चालू हंगामात हजारो पर्यटकांनी पुष्पपठाराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असून, देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने पठाराला भेटी देत आहेत. शनिवार, रविवार, सलग सुटीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रिमझिम पावसात भिजण्याबरोबरच पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेºयात टिपून ठेवत आहेत. पठारावरील बहुतांश फुलांना बहर आल्याने सर्वत्र रंगबिरंगी फुलांचे गालिचे पाहावयास मिळत आहेत. कास पठारासह कास तलावालाही अनेकजण भेटी देत आहेत.अधूनमधून पावसाला सुरुवात होत असल्याने जलधारा अंगावर झेलत पर्यटक हिरवळीतून भटकंती करताना दिसत आहेत. पठारावर देखरेख व मार्गदर्शनासाठी वनविभागाचे कर्मचारी तसेच कास, कासाणी, आटाळी, एकीव, पाटेघर, कुसुंबिमुरा कार्यकारिणी समितीचे कर्मचारी, गाईड, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.या फुलांना बहर...सध्या पठारावर कापरू, टूथब्रश, दीपकांडी, रान महुरी, सीतेची आसवे, रानवांगे, गेंद, चवर, कापरू, नीलिमा, अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी फुलांना चांगला बहर आला असून, गेंद, सीतेची आसवे, तेरडा मोठ्या या प्रमाणावर बहरला आहे. बहुतांशी ठिकाणी तेरड्याचे गालिचे सजले आहेत. यामुळे हा परिसर मनमोहक बनू लागला आहे.