शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

कांद्याला मिळतोय किलोला ५ पासून १५ रुपयांपर्यंत भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...

सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ५०० पासून १५०० ते १६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी, टमाट्यानंतर आता वांग्याचा दर एकदम खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची २४८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील १५ दिवसांपूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ३५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर एकदमच दर गडगडला.

सातारा बाजार समितीत गुरुवारी ५२ वाहनांतून ३९७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये बटाटा ६१, लसूण ३६ आणि आल्याची १६ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. गवरचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला २०० ते २५० पर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आला, तर वांग्याला १० किलोला ६० ते ८० रुपये दर मिळाला. टमाटा ४० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर एकदमच कमी झाला आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १०० अन् दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १२०० हजारांपासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारांपासून तीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १५००पर्यंत दर मिळाला. आल्याला दर आणखी कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे, तर लसणाला क्विंटलला २ ते ४ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही कमी होऊ लागला आहे. वाटाण्याला पाच हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

चौकट :

मेथी, कोथिंबीर दरात सुधारणा...

सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या दीड हजार पेंडीची आवक झाली. याला शेकडा ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ३०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला, तर पालकला शेकडा २०० ते ३०० रुपये दर आला.

......................................................