शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दर वाढताच कांद्याचा घमघमाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:32 IST

लोणंद : लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक फक्त ७४० पिशव्यांची झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तेजीत गेले आहेत. कांद्याची आवक रोडावलेली असल्याने दर ३४०० रुपयांवर गेले असल्याने कांदा उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.सध्या कांद्याला चांगला भाव मिळताना ग्राहकांना मात्र तो रडवताना दिसत ...

लोणंद : लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक फक्त ७४० पिशव्यांची झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तेजीत गेले आहेत. कांद्याची आवक रोडावलेली असल्याने दर ३४०० रुपयांवर गेले असल्याने कांदा उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.सध्या कांद्याला चांगला भाव मिळताना ग्राहकांना मात्र तो रडवताना दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे.लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी-विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, भोर, पुरदंर, बारामती आदी तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस उत्पादक शेतकरी आणतात. लोणंद परिसरात पिकणाºया दर्जेदार कांद्यामुळे या देशभरात नावलौकिक आहे. चवीला चांगल्या असलेल्या लोणंद बाजार समितीमध्ये येणाºया या कांद्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. कांदा हे नाशवंत पीक असून, उन्हाळ्यात शेतकºयांनी साठवलेला गरवा कांदा सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत मार्केटला पुरतो; पण उन्हाळी कांदा फक्त महाराष्ट्र राज्यातच पिकतो. त्यामुळे सप्टेंबरनंतर नवीन हळवा कांदा बाजार येईपर्यंत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढून कांदा ग्राहकांना चांगलाच रडवतो.महाराष्ट्राबरोबरच भारत देशात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो. मात्र यंदा अवेळी व उशिरा पडलेला पाऊस, खराब हवामानाचा सर्वत्रच कांदा पिकास फटका बसला असून, कांदा उत्पादक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे बाजार समितीमधील कांद्याची आवक चांगलीच रोडावलेली दिसत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची गुरुवारी आवक फक्त ७४० पिशव्या झाली असून, कांद्याचे दर ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तेजीत निघाले आहेत. राज्यात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीमध्ये देखील कांद्याची आवक मात्र अद्यापपर्यंत चांगली होत नाही. मात्र कांद्याचे दर ३ हजार ४०० रुपयांवर गेले असल्याने कांदा उत्पादकाना अनेक महिन्यांनी चांगले दिवस आले आहेत. कांद्याला भाव मिळत आहे; पण हाच कांदा ग्राहकांना मात्र चांगलाच रडवताना दिसत आहे.कांदा वाळवून आणण्याचे आवाहन...लोणंद बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत आहे. कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे. गुरुवारी लोणंद बाजार समितीमध्ये गेल्या गुरुवारी ७४० कांदा पिशव्यांची आवक झाली असून, कांद्याचे दर कांदा नंबर १-२४०० ते ३४००, कांदा नंबर २-१००० ते २४००, गोल्टी कांदा ८५० ते १००० रुपये असे निघाले आहेत. लोणंद बाजार समितीमध्ये शेतकºयांनी कांदा चांगला वाळवून प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती