शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:48 IST

सातारा शहरापासून जवळच असलेल्या महादरे तलावामध्ये रविवारी रात्री एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देसाताऱ्यातील महादरे तलावात एकाची आत्महत्या सोमवारी सकाळी उघडकीस आली घटना

सातारा: शहरापासून जवळच असलेल्या महादरे तलावामध्ये रविवारी रात्री एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.विजय प्रताप गुजर (वय ५०, रा. अंबवडे बुद्रुक ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महादरे तलावमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला याची माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीमचे जवान तत्काळ तलावर पोहोचले. या जवानांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेहाच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळून आली असून त्यामुळेच मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह विजय गुजर यांचा असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची कल्पना दिली. गुजर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आलेले नसून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याSatara areaसातारा परिसर