सातारा: सातारा तालुक्यातील गणेशवाडी येथील एकाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र मुगटराव गायकवाड (वय ५५, रा. गणेशवाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र यांनी गणेशवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या गणेशवाडी खिंड ते सोनापूर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला प्रकाश मनोहर पवार यांच्या शेताच्या जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर संभाजी एकनाथ पवार (वय ४५, रा. गणेशवाडी) यांनी बोरगाव पोलिसांत दिली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समजले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.
गणेशवाडी येथे एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST