शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात एकास एक...

By admin | Updated: August 28, 2014 22:21 IST

सातारा-जावळी विधानसभा : विरोधकांच्या हालचाली सुरू; लढत लक्षवेधी होण्याचे संकेत

सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राजकीय विरोधक त्यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने अंतर्गत बैठकाही सुरू असून उमेदवाराची घोषणा काही दिवसांतच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, हा मतदारसंघ महायुतीच्या माध्यमातून कोणाकडे जाईल, याविषयी अजूनही निश्चित असे काही ठरले नसल्यामुळे कोणी बोलायलाही तयार नाही. परिणामी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकतर्फी असणारा हा मतदारसंघ आता लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात जावळी तालुका, सातारा शहर आणि ग्रामीण भाग समाविष्ट आहे. येथे असणारी बहुतांशी सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ताब्यात आहेत. जावळी तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विचार करता सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे आणि सेना-भाजप युतीचा विचार करता गतवेळी हा मतदारसंघ भाजपकडे होता. येथून नरेंद्र पाटील भाजपचे उमेदवार होते. आता मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच हा मतदारसंघ आता भाजपकडेच राहणार की सेनेकडे जाणार याविषयी ठामपणे सांगता येत नाही.२00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात भाजपचे नरेंद्र पाटील, बहुजन समाज पार्टीचे प्रशांत चव्हाण, स्वाभिमानी पक्षाच्या वर्षा देशपांडे, लोकजन शक्ती पार्टीचे प्रदीप शिवदास आणि अलंकृता बिचुकले, किशोर धुमाळ, संजय जाधव हे सात उमेदवार होते. गेल्यावळचे उमेदवार यंदा असतील की नाही, याविषयी सांगता येत नाही.मैत्रीपूर्ण लढती झाल्या अथवा दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तर येथून शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा उमेदवार असणार याविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. सातारा विधानसभा मतदारसंघात जरी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार झाला तर येथून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याचा शोध घ्यावा लागणार आहे. सातारा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहिल, अशी शक्यता गृहीत धरूनच रवींद्र पवार, दत्ताजी थोरात व नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीला राम-राम करून शिवबंधन हाती बांधण्यासाठी निघालेले राजेंद्र चोरगही पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीच ‘एकास एक उमेदवार’ देण्याचा पुढाकार घेतला असल्याचे समजते. (प्रतिनिधी)