शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यामुळे ओंड विभाग दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 10:57 IST

Leopard Satara- कऱ्हाड दक्षिणेतील ओंड विभागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. कऱ्हाड ते चांदोली मार्गावर युवकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, शेतकऱ्यांतून केली जात आहे.

ठळक मुद्देबिबट्याच्या हल्ल्यामुळे ओंड विभाग दहशतीखाली ग्रामस्थांमध्ये वाढली भिती : जिवघेण्या हल्ल्यातून युवक सुदैवाने बचावला

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेतील ओंड विभागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. कऱ्हाड ते चांदोली मार्गावर युवकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, शेतकऱ्यांतून केली जात आहे.ओमकार राजेंद्र थोरात (वय २७) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ओंड येथील जगदंबा पेट्रोल पंपापासून उंडाळेकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून ओंकार थोरात शेतात निघाला होता. या परिसरात दक्षिण मांड नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरून जात असताना एका विहिरीजवळ बिबट्या व त्याचा बछडा अचानक शेतातून बाहेर पडला.

बिबट्याची मादी पुढे निघून गेली. मात्र त्याच्या मागे असणाऱ्या बछड्याने अचानक ओमकार थोरात याच्या दुचाकीवर झेप मारली. त्यामुळे ओंकार दुचाकीवरून खाली कोसळला. त्याच्या हातावर बिबट्याने पंजा मारला. त्यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्या हातातून रक्त वाहू लागले.

जीव वाचवण्यासाठी जखमी ओंकार याने भीतीने आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेताच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर ओंकार भीतीने नजीक असणाऱ्या आपल्या घराकडे निघून गेला. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी घडला. त्यानंतर दोन दिवस बिबट्याचा याच परिसरात वावर होता.ओंड परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील शेतात जाण्याचा शेतकरी घाबरत आहेत. शेतीच्या कामावर परिणाम होत असून वन विभागाने बिबट्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी होत आहे.ऊसाच्या शेतात वावर वाढलाओंड, उंडाळे परिसरातील ऊसाच्या शेतामध्ये बिबट्यासह दोन बछडे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याकडून शेतकऱ्यांवर हल्ला होऊ शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी तांबवे परिसरात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. काले परिसरातही यापूर्वी त्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे धोका दिवसेंदिवस वाढत असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरKaradकराडforest departmentवनविभाग