शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांच्या कानी टोल मुक्ती गीत!   : गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:55 IST

या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटोल विरोधी चळवळ -- आता लढा मूलभुत सुविधांसाठी

सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडिओ गीताच्या स्वरूपात  व्हायरल झाले आहे. सोशल मिडियावर असलेले हे गीत अधिकाºयांच्या कानी पडावे यासाठी टोलविरोधी जनता चळवळीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अधिकाºयांकडे जावून हे गीत त्यांना दाखवून महामार्ग असुविधांची तिव्रता दर्शविण्यात येत आहे.

महामार्गावरील असुविधां विरोधात आवाज उठविण्यासाठी सोशल मिडियावर ‘टोल विरोधी जनता’ या नावाने चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सुरक्षित महामार्ग देण्यासाठी प्रशासन कार्यरत झाल्यानंतर आता चळवळीने मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या मागणीकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. खड्डेमुक्त महामार्ग करण्याचे काम सर्वत्र सुरू झाल्यानंतर आता महामार्गावरील मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.

चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेवून त्यांना हे गाणे ऐकवले. या गाण्याच्या चित्रीकरणाचे कौतुक करून राऊत यांनी महामार्ग दुरवस्थेबाबत तातडीने प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगिंतले. यावेळी रवींद्र नलवडे, महेश महामुनी, महारूद्र तिकुंडे, महेश पवार, रोहित सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकार रस्ता चांगला कर...!टोल विरोधी जनता चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते महेश पवार यांनी ‘सरकार रस्ता चांगला कर नाहीतर टोल बंद कर.. आत उठ सातारकर त्याच्यासाठी तुच काही तर कर’ हे गीत तयार केले आहे. अडीच मिनिटाच्या या गीतात पुणे- सातारा महामार्गावरून प्रवास करणाºयांच्या यातना कथित करण्यात आल्या आहेत. या गाण्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला असून तोही समाज माध्यमांत चांगलाच पाहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये सामान्य सातारकरांनी भूमिका बजावल्या आहेत

 

टोल विरोधी जनता ही चळवळ संवेधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा गांधीगिरीचा मार्ग अवलंबणं याला आम्ही प्राधान्य देणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहोत. सार्वजनिक आंदोलन करताना यापूर्वी कधीही कोणीही असा प्रयोग केला नाही. शासकीय यंत्रणेला जागृत करण्यासाचा आमचा हा एक प्रयत्न आहे.- महेश पवार, गीत संकल्पक 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका