शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

By दत्ता यादव | Updated: August 27, 2023 19:33 IST

 अमेरिकेतील कार्यालयाला सायबर सेलकडून मेल...

सातारा: सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील अधिकृत पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रविवारी रीतसर तक्रार करण्यात आली असून, संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून अँडमिनचा अॅक्सेस काढून घेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर हे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले.

याबाबतची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली असून, त्या पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट अपलोड झाल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट फाॅरवर्ड केल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

 अमेरिकेतील कार्यालयाला सायबर सेलकडून मेल...

सायबर सेलने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, अमेरिकेतील फेसबुक कार्यालयाशी मेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज नेमके कोठून व कोणी हॅक केले, याची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती मिळण्यास कधी चार दिवस तर कधी चाळीस दिवसही लागत असल्याचे सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेFacebookफेसबुक