शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी येतील जातील; पण गावपण टिकावं..! - रोहिणी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:38 IST

मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन मला अपात्रतेबाबत नोटीस दिली. त्यात चुकीची भाषाशैली वापरली. त्यामुळे सोमवार,दि. १६ पासून मी नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी उठणार नाही. - रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, क-हाड

ठळक मुद्देविश्वासात घेऊनच अतिक्रमण हटविणार

प्रमोद सुकरे ।क-हाड : क-हाड शहरातील अतिक्रमण काढलेच पाहिजे. याला कोणाचा विरोध असण्याची गरज नाही; पण शहरात ज्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली गेली. ती पद्धत चुकीची आहे. पूर्व सूचना न देता, नोटीस न देता केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची नाहक नाराजी ओढावली आहे. अधिकारी येतील-जातील; पण गावाचं गावपण टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे, असे मत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रश्न : मुख्याधिकारी व तुमच्यात नेमका काय वाद आहे?उत्तर : ते सन्मानजनक वागणूक कोणालाच देत नाहीत. त्यांचं एकंदरीत वागणंच चुकीचं आहे. महिलांशी कसं बोलावं हे त्यांना कळत नाही. पालिकेत नगराध्यक्षा म्हणून विश्वासात घेत नाहीत, मनमानी करतात. अशा माणसाशी वाद नाही होणार तर काय होणार?

प्रश्न : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थांबली आहे काय?उत्तर : तसे काही नाही. यापुढे नागरिकांनी विश्वासात घेऊन कायद्याच्या चाकोरीतून नोटिसा देऊन ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. त्याबाबत विशेष सभेमध्येही चर्चा झाली आहे.

प्रश्न : घरकूल योजनेत राहणाºया महिलांनी बोंबाबोंब आंदोलन का केले?उत्तर : वास्तविक, तेथे राहणाºया लोकांनी तेथील दयनीय अवस्था आम्हा साऱ्यांसमोर मांडली आहे. आमचे आरोग्य सभापती महेश कांबळेही वेळोवेळी त्याबाबत आग्रही राहिले आहेत. तेथे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. पण ते काम करण्याला मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देतात. हे लोकांच्याही लक्षात आले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. आता मात्र आम्ही त्या कामाला लगेच गती देऊ.

... त्याचे श्रेय लोकसहभागाला!कºहाड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील काम निश्चितच चांगले आहे. त्याची पोहोच पावतीही गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला मिळाली आहे. पण त्याचे सर्व श्रेय लोकसहभागाला जाते. आम्ही सर्वजण फक्त निमित्त मात्र आहोत. नागरिकांनी यापुढे असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुनर्वसनासाठी सकारात्मकशहरातील हातगाडा चालकांच्य पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या सतरा दिवसांपासून प्रलंबित असला तरी आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत. बहुसंख्य हातगाडा व्यावसायिक हे अंत्यत गरीब आहेत आणि त्यांचे पुनर्वसन होणे ही बाब गरजेचे आहे. त्यांच्याशी एक-दोनदा चर्चा झाली आहे. त्यातून काही प्रमाणात मार्ग निघाले आहेत. त्याची अंमलबजावणी प्रशासन गतीने करेल.

टॅग्स :MayorमहापौरSatara areaसातारा परिसर