शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांनी कारवाईची हिम्मत ठेवावी : कल्पनाराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:27 IST

पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी कारवाईची हिम्मत ठेवावी, कल्पनाराजे भोसले यांच्या नगरसेवकांना सूचनादबावाखाली काम न करण्याचाही दिला सल्ला

सातारा : पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सकाळी दहा वाजता आघाडीतील नगरसेवकांनी बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती सविता फाळके, आरोग्य सभापती विशाल जाधव, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता पवार, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक आदी उपस्थित होते.नगरसेवक विनोद ऊर्फ बाळासाहेब खंदारे यांनी पालिकेत केलेल्या आंदोलनाचा कल्पनाराजे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ह्यपदाधिकारी असो कर्मचारी कोणीही दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल तर थेट कारवाई करा.

सभागृहाची उंची कमी होईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सातारकरांचे प्रश्न अन् त्यांच्या अडचणी या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या प्राधान्याने सोडवा,ह्ण अशा सूचना करतानाच कल्पनाराजे यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावाही घेतला.मल्हारपेठेतील महिलांवर आगपाखडनगरसेवक खंदारे यांच्या प्रभागातील काही महिला स्वच्छतागृहाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालिकेत आल्या होत्या. सभागृहात बैठक सुरू असतानाच त्या सभागृहात जाण्याचा वारंवार प्रत्यत्न करीत होत्या. ही बाब नजरेस पडताच कल्पनाराजे भोसले यांनी सभागृहातून बाहेर येत संबंधित महिलांचा खरपूस समाचार घेतला.

महिलांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या म्हणाल्या, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची व दुरुस्तीची जबाबदारी एकट्या पालिकेची नाही तर ती नागरिकांचीदेखील आहे. जर तुम्हाला त्यांची निगा राखता येत नसेल तर प्रत्येकाने आपल्या घरात स्वच्छतागृह बांधावे. यासाठी पालिका अनुदान देत आहे. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी नगराध्यक्षांना दिल्या.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर