शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात खांद्यावर ‘अंधाराचं ओझं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:15 IST

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देजावळी तालुक्यातील कांदाटी खोºयामध्ये खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिकाउध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंदसाधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे. अतिवृष्टी व वादळवाºयांमुळे डोंगरपठारावरील तीन विद्युत खांब पडल्याने १५ दिवस त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत.         दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने भर पावसात, चिखलात याठिकाणी नवीन विद्युत पोल बसविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.जावळी तालुक्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे वाघावळे, उचाट, कांदाट, सालोशी, मोरणी, महाळुंगे, शिंदी वलवल, चकदेव, आकल्पे, निवळी, लामज या ६ हजार लोकवस्ती असलेल्या भागात गेले पंधरा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिवनावश्यक असणारी पिठाची गिरण व मोबाईल चार्जिंग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक घरात भात-आमटी व्यतिरिक्त कोणतेही खाद्य बनवता येत नाही.  

        नैसर्गिकरित्या डोंगरपठारावरुन पाणी येत असल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. हे खांब घेवून जाण्यासाठी कोणत्याही यंत्रणेचा वापर न करता कर्मचारी व ग्रामस्थ निसरड्या वाटेने हे लोखंडी खांब खांद्यावरुन झोळी करुन घेवून जात आहेत.सध्या पावसाळ्यामुळे या भागातील प्राथमिक शाळेला सुट्टी आहे. १५ आॅगस्टला नियमितपणे शाळा सुरु होणार आहे. तत्पूर्वी विद्युत पुरवठा व शिंदी ते लामज, लामज ते आकल्पे हा वाहून गेलेला व उध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, राजाराम मोरे, सीताराम जंगम, काशिनाथ पाटील, आर. आर. चव्हाण, वाघावळे सरपंच सदाशिव जंगम, सुभाष मोरे, काशिनाथ कदम, यशवंत सावंत हे ग्रामस्थ वीज कर्मचाºयांना सहकार्य करीत आहेत.या भागातील व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मूळगाव दरे तर्फ खांब आहे. तेसुद्धा येथील विकासकामांबाबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत.विजेच्या पोलचे वजन ७०० किलो...जावळी तालुक्यातील कांदाटी खोरे हा दुर्गम भाग आहे. या भागात पाऊस आणि वारे अधिक असते. त्यामुळे अशा भागात लोखंडी खांबच उपयुक्त ठरतात. कारण, सिमेंटच्या खांबापेक्षा याचे वन कमी असते. साधारणपणे खांब दोन प्रकारच्या वाहिन्यांसाठी वापरण्यात येतात. कमी दाबाच्या वाहिनीसाठी ७०० किलो आणि ८ मिटरचा तर उच्च दाबाच्या वाहिनीसाठी ९०० किलो वजन आणि ९ मिटरचा खांब वापरला जातो. हे पोल नेणे सहज शक्य होते. साधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात. सध्या डोंगर पठारावर खांब घेऊन जाण्यासाठी ‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.