शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

ऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:04 IST

Koyana Dam, sataranews, rain, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो.

ठळक मुद्देऑक्टोबर महिन्यात १० वर्षांमध्ये कोयनेतून सोडले सहावेळा पाणी अतिवृष्टीचा परिणाम : दरवाजातून करण्यात आला विसर्ग; यंदाही पाणी सोडले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे भरतात. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू करावा लागतो. पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी सोडले जाते. पण, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होत असेल तर ही बाब वेगळी ठरते. अशाचप्रकारे मागील १० वर्षांत ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे कोयनेच्या दरवाजातून सहावेळा पाणी सोडावे लागले आहे.जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली, कास या भागात पावसाळ्यात धुवाँधार असते. या भागातील पावसावरच कोयना धरणा धरण भरणार का नाही हे अवलंबून राहते. तसेच प्रमुख धरणे ही जिल्ह्याच्या पश्चिम भागातच आहेत. अपवाद वगळता दरवर्षी ही धरणे भरतात.

बहुतांशीवेळा ऑगस्ट अखेरपर्यंत धरणे भरुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतो. तर सप्टेंबर महिन्यापासून पश्चिमेकडे पाऊस कमी होतो. मात्र, मागील काही वर्षांत ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली. हा पाऊस पश्चिम भागातही होत असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून विसर्ग करावा लागला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरू करावा लागलेला. तर यंदाही ऑक्टोबर महिन्यात सतत पाच दिवस चांगलाच पाऊस झाला. तर १३ आणि १४ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले. पायथा वीजगृह तसेच सहा दरवाजे वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडावे लागले.कोयना धरणाचा विचार करता २०१० पासून आतापर्यंत सहावेळा अतिवृष्टीमुळे दरवाजातून पाणी सोडावे लागले आहे. यापूर्वी २०१० च्या ऑक्टोबरमध्ये तीनवेळेला दरवाजातून विसर्ग करावा लागलेला. तर २०१३ लाही तीनवेळा, २०१६ ला सहावेळा, २०१७ ला दोन आणि २०१९ मध्ये तब्बल सातवेळा ऑक्टोबरमध्ये कोयनेच्या दरवाजाातून पाणी सोडावे लागलेले. यावर्षीही अतिवृष्टीमुळे विसर्ग करावा लागला आहे.कोयनेला आतापर्यंत ४४६७ मिलिमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदा गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागीवर्षी कोयनेला आतापर्यंत ७३६६ मिलिमीटर पाऊस झालेला. तर यावर्षी १८ ऑक्टोबरपर्यंत फक्त ४४६७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच नवजा येथेही पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे.

गतवर्षी ८३९३ तर यंदा ५१७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ५१९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी ७३११ मिलिमीटर पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला होता. यावर्षी पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर