शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भित्तीचित्रावरून उदयनराजे-शंभुराज यांच्यात बिनसले!, शंभूराज देसाई म्हणाले..

By दीपक देशमुख | Updated: March 7, 2023 19:39 IST

चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली

सातारा : पोवई नाक्यावरील इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र काढण्यास पोलिसांनी हरकत घेतली. यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे यांच्यात वितुष्ट आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, याबाबत खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाचे पदाधिकारी यांची शंभुराज देसाई यांच्या बंगल्यावर तसेच पोलिस अधीक्षकांच्या दालनात बैठका झाल्या. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.याबाबत माहिती अशी, खासदार उदयनराजे भोसले यांच्या इमारतीच्या भिंतीवर राजे समर्थकांना त्यांचे चित्र रेखाटायचे होते. पोवई नाक्यावरील ही इमारत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाशेजारीच आहे. चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली. संबंधित कारागिराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे राजे समर्थकांच्या नाराजीतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.त्यानंतर शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर उदयनराजे समर्थक सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंकज चव्हाण यांची शंभूराज यांच्यासमवेत बैठक झाली. काटकर यांनी सर्व वस्तुस्थिती देसाई यांच्या कानावर घालून सर्व बाबी या पूर्वपरवानगीने असल्याचे सांगितले. छायाचित्र रेखाटन हा प्रकारच मला माहीत नव्हता. खासदार उदयनराजे भोसले हे आमचे जवळचे मित्र व पक्षातील सहकारी आहेत. त्यांचे रेखाचित्र चितारले जाणार असेल तर मला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.रेखाचित्र प्रकरणावर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या दालनातही बैठक झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, संग्राम बर्गे, मनोज शेंडे, प्रीतम कळसकर, प्रशांत अहिरराव, भाऊ चौगुले, गणेश जाधव संदीप शिंदे उपस्थित होते. बैठकीत रेखाचित्र प्रकरणाला पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. गैरसमजुतीतून पोलिसांनी कारागीराला हटकल्याचे कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना सांगितले.याबाबत सुनील काटकर म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराण्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. रेखांकन प्रकरणात जी माहिती व्हायरल झाली, त्यामध्ये तथ्य नाही. कोणीही उदयनराजे भोसले व शंभूराज देसाई यांच्यात वितुष्ट असल्याचे राजकीय गैरसमज करू नयेत. या प्रकरणावरून कोणताही तणाव नाही. कोणीही या प्रकरणाचा गैरअर्थ काढू नये, असे आवाहन काटकर यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShambhuraj Desaiशंभूराज देसाई